Mahabreaking

[breaking_news]

prizes distributed :धामणगाव येथील जि.प. शाळेत गुणवंतांचा गौरव; विविध ज्ञानस्पर्धांतील बक्षीसांचे वितरण

prizes distributed : येथून जवळ असलेल्या धामणगाव येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा, धामणगाव येथे बालकदिनाचे औचित्य साधून ज्ञानस्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

prizes distributed

पंडीत सावळे

 मासरुळ :  येथून जवळ असलेल्या धामणगाव येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा, धामणगाव येथे बालकदिनाचे औचित्य साधून ज्ञानस्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी इंग्रजी शब्दार्थ लेखन स्पर्धा २०२६ व ज्ञानसागर सामान्य ज्ञान स्पर्धा २०२६ मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू इंग्रजी शब्दार्थ लेखन पुरस्कार २०२६, सावित्रीबाई फुले ज्ञानसागर सामान्य ज्ञान पुरस्कार, राष्ट्रमाता जिजाऊ सामान्य ज्ञान पुरस्कार, युगपुरुष स्वामी विवेकानंद सामान्य ज्ञान पुरस्कार २०२६ यांचे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जि.प. समूह साधन केंद्र, धामणगाव येथील केंद्र समन्वयक  रमेश विठ्ठल यंगड, सरपंच दुर्गाबाई सुरडकर, पोलीस पाटील   सविताताई पवार, उपसरपंच   केशरताई भिमराव पायघन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष   देवेंद्र शालिग्राम पायघन, माजी अध्यक्षा   वैशालीताई देवेंद्र पायघन यांच्यासह   रामेश्वर पायघन,  सुनील देवकर,   भिमराव पायघन आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेतील शिक्षक   किशोर नाटेकर,   राहुल हिवाळे,   ठमाजी साकळे, शिक्षिका   नलिनी राऊत,   सविता इंगळे,   वैशाली सोनटक्के तसेच उपक्रमशील शिक्षक  मोतीराम किसन कापरे यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे  संचालन   किशोर नाटेकर यांनी केले, तर आभार ठमाजी साकळे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top