Mahabreaking

🔴 BREAKING
Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Jay Bajrang Vidyalaya :राज्यस्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेत जय बजरंग विद्यालय संघाला कांस्य पदक The election campaign :ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू ; नामनिर्देशन काळात तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त The public relations process :शेवटच्या वक्तीपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी जनसंपर्क प्रक्रीया अधिक प्रभावी करावी : आर. विमला Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू

Melody Group :मेलोडी ग्रुप प्रस्तुत ‘वसंत बहार’ – सुरांच्या मैफिलीने जिंकली रसिकांची मने

Melody Group : सांस्कृतिक व संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मेलोडी ग्रुप, अकोट प्रस्तुत ‘वसंत बहार’ या सुरांच्या मैफिलीने रसिकांची मने जिंकली.या मैफिलीत अनेक सदाबहार हिंदी व मराठी गीते सादर करण्यात आली. ‘हुस्न पहाडों का’,‘एक तेरे ही चेहरे पर’, ‘प्रियतमा प्रियतमा’,‘घुंगट की आड से’,‘हृदयी वसंत फुलताना’ यांसारख्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले.

Melody Group

अकोट : सांस्कृतिक व संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मेलोडी ग्रुप, अकोट प्रस्तुत ‘वसंत बहार’ या सुरांच्या मैफिलीने रसिकांची मने जिंकली.या मैफिलीत अनेक सदाबहार हिंदी व मराठी गीते सादर करण्यात आली. ‘हुस्न पहाडों का’,‘एक तेरे ही चेहरे पर’, ‘प्रियतमा प्रियतमा’,‘घुंगट की आड से’,‘हृदयी वसंत फुलताना’ यांसारख्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले.

विशेषतः फिमेल सिंगर हेमा जोशी (अकोला) यांच्या मधुर व सुरेल आवाजाने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.हा कार्यक्रम दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नंदुभाऊ शेगोकार यांच्या शेतकरी मोटर्स, दर्यापूर रोड, अकोट येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे बहारदार व रंगतदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर प्रविण पुंडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेलोडी ग्रुपचे अध्यक्ष योगेश वर्मा,सचिव भास्करराव वानखडे, नंदुभाऊ शेगोकार, हिम्मत दंदी, कोषाध्यक्ष अरुण सांगळूदकर तसेच व्यवस्थापक कैलास बोरकुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी नंदुभाऊ शेगोकार, संदिप ढोक,मिलिंद तेलगोटे, पवन पातूरकर,ओमप्रकाश डेबला ,अनंत काळे,विजय भोरे,सुनिल धुळे,आदित्य गुप्ता, किरण गुहे,योगेश वर्मा,दीपक तळोकार,स्वप्नील आढे,भास्कर वानखडे,मोहन सपकाळ, कन्हैया गौर,डॉ.विशाल इंगोले,आशिष बारबदे,गजानन तायडे,श्याम राऊत,हिम्मत दंदी, कैलास बोरकुटे,आनंद भोरे, अरुण सांगळूदकर,प्रताप सोळंके,दिगंबर वणारे या गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात गीते सादर केली. कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण वातावरण सुरमय केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top