Mahabreaking

[breaking_news]

Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा

Solve Murder Case : तीन वर्षापूर्वी सुकळी येथील एक ३४ वर्षीय युवकाची हत्या करून मृतदेह हॉटेलच्या काउंटरखाली पुरवला. तीन वर्षांपासून आरोपी निर्धास्त असतानाच मेहकर पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. 21 एप्रिल रोजी मेहकर पोलिसांनी हॉटेलमध्ये पुरवलेल्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. विनोद अश्रुबा नवले असे मृतक युवकाचे नाव आहे.चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशा या धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

Solve Murder Case

 हॉटेलच्या जागेत पुरवलेल्या मृतदेहाचे अवशेष काढले बाहेर: दोन आरोपी गजाआड

अमर राऊत 

 मेहकर: चार वर्षापूर्वी सुकळी येथील एक ३४ वर्षीय युवकाची हत्या करून मृतदेह हॉटेलच्या काउंटरखाली पुरवला. चार वर्षांपासून आरोपी निर्धास्त असतानाच मेहकर पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. 21 एप्रिल रोजी मेहकर पोलिसांनी हॉटेलमध्ये पुरवलेल्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. विनोद अश्रुबा नवले असे मृतक युवकाचे नाव आहे.चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशा या धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

पोलीस स्टेशन मेहकर येथे दि. 17 एप्रिल रोजी मेहकर शहरातील एका महीलेने तिचा नवरा त्रास देत असल्या कारणाने त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. तसेच तिने तिच्या पतीवर यापुर्वी एक खुनाचा प्रयत्न चा गुन्हा नोंद असल्याचे व त्याने चार वर्षापुर्वी सुकळी गावाच्या सुनिल जाधव नावाचे इसमासोबत मिळुन एका व्यक्तीचा घातपात केल्याचा संशय पोलीसा समोर व्यक्त केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करणेकरीता व पुरावे गोळा करणेकरीता पोलीसांनी सदर महीलेचा पती व त्याचा साथीदार याचेवर पाळत ठेवुन अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली होती. पोलीस आपले व आपल्या साथीदाराबाबत चौकशी करीत आहेत याची माहीती आरोपीस मिळाल्यामुळे तसेच त्याला दुसरा कोणताही पर्याय राहीला नसल्याने सदर महीलेचा पती आरोपी नामे सचिन ज्ञानेश्वर उगले हा पोलीस स्टेशन मेहकर येथे दि.21/04/2026 रोजी आला व त्याने पोलीसांना माहिती दिली की, त्याने स्वताः व आरोपी सुनिल बाजीराव जाधव रा.सुकळी ता. गेहकर दोघांनी मिळुन में 2022 मध्ये गयत नामे विनोद अश्रुबा नवले याची हत्या केली. मेहकर ते मोळा रोडवरील रहेमान उर्फ बाबा भिकु कुरेशी याचे जामगाव शिवारातील शेतात, त्यावेळी चालु असलेल्या हाटेल पैलवान मध्ये दारु पाजुन धारदार कैचीने व चाकुने त्याचे गळयावर व छातीवर वार करुन जिवे ठार मारले. तसेच त्याचे प्रेत हाटेल मागे खड्डा खोदुन पुरले व त्यावर सिमेंट चा कोबा केला असे सांगीतले.

Solve Murder Case

वरीलप्रमाणे मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवारी मेहकर पोलीसांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय प्रतीनिधी नायब तहसिलदार सरकारी पंच, फॉरेन्सीक तजज्ञ, खडडा खोदनेकरीता नगरपालीकेचे कर्मचारी, पंचनामा साहीत्य, वैदयकीय अधिकारी  अमित थांडे ग्रा.रु मेहकर यांना घेवुन घटनास्थ्ळावर धाव घेतली. तसेच सचिन ज्ञानेश्वर उगले याचे सहीत त्याने दाखविलेल्या जागेवर जावुन जेसीबी व मजुराव्दारे व्हिडीओ शुटींग करुन खडडा खोदकाम केले असता त्या ठिकाणी एक मानवी सांगाडा मिळुन आला. सांगाडयावर आढळून आलेले कपडे तसेच इतर वस्तुवरुन हा प्रेताचा सांगाडा हा पोस्टे मेहकर येथे आम्ही दाखल केलेल्या माझा भाऊ विनोद आश्रुबा नवले रा सुकळी ता मेहकर याचाच असल्याचे मयताचे नातेवाईकांनी ओळखले आहे. सदर मयत इसमाची मेहकर पोलीस स्टेशनला चार वर्षापुर्वी मिसींग दाखल असुन नमुद प्रकरणात आरोपीतांनी कट रचुन यातील आरोपी सचिन उगले याने मयतासोबत ओळख वाढवली. तसेच त्याच्यासोबत मैत्री करुन त्यास 02 मे 2022 रोजी दुपारी त्याचे मोळा रोडवरील हॉटेल मध्ये दारु पाजवली व त्यानंतर आरोपी नामे सुनिल बाजीराव जाधव रा.सुकळी ता. मेहकर यास हॉटेलवर बोलावले. तेथे  दोघांनी मिळून विनोद नवले याचा धारदार शस्त्राने खुण करुन त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याच्या हॉटेल पैलवान मोळा रोड, मेहकर चे मागे शेतामध्ये जमिनीत पुरुन त्यावर सिमेंट काँक्रीटचा कोबा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलीसांनी अत्यंत तत्परतेने केलेल्या कार्यवाही वरुन मयतचा भाऊ फिर्यादी नामे मनोज आश्रुबा नवले यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे. मेहकर येथे अप नं.300/2026 कलम 302,201,120 (ब) भादवि.प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.  गुन्हयात वरील नमुद दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोनि व्यंकटेश आलेवार हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा  अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गर्शनाखाली व्यंकटेश आलेवार पोनि.पोस्टे. मेहकर, सपोनि संदिप बिरांजे, सपोनि अशोक अवचार, सपोनि विनोद नरवाडे, पोउपनि किरण खाडे, पोउपनि गणेश कड, सफौ काळे, गव्हाणे, राजु काळे, पोहेकॉ कटक, पवार, शिवनकर, चव्हाण, जायभाये, ठाकरे, घुगे, पोका मोहम्मद, अवचार, तांबेकर, ईब्राहीम, पैठणे, करीम, गारोळे, सरकटे, घोडाम, खारडे पोस्टे मेहकर यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top