MB Karate Team : नेपाळमधील काकरभिट्टा येथे २२ ते २४ मे दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मयूर कप कराटे स्पर्धेत एम.बी. कराटे संघाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्याचा तसेच देशाचा नावलौकिक उंचावला. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, भूतान आणि पाकिस्तानसह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

नेपाळमध्ये एम.बी. कराटे खेळाडूंची चमक; आंतरराष्ट्रीय मयूर कपमध्ये पदकांची कमाई
संजय तायडे
बोरगाव मंजू : नेपाळमधील काकरभिट्टा येथे २२ ते २४ मे दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मयूर कप कराटे स्पर्धेत एम.बी. कराटे संघाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्याचा तसेच देशाचा नावलौकिक उंचावला. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, भूतान आणि पाकिस्तानसह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे उद्घाटन नेपाळचे पर्यावरण मंत्री व कोशी प्रांतातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेदरम्यान एम.बी. कराटे संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत विविध गटांमध्ये यश मिळविले. महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या या संघाने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी नोंदविल्याने राज्याच्या क्रीडा क्षेत्राला अभिमानास्पद यश मिळाले.
एम.बी. कराटे संघातील आयर्न शेलोलार, रुद्र फुके, तन्मय ठाकरे आणि अन्य खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच तन्मय ठाकरे, मनश्री इंगळे, यश वानखडे, शाम ताकम, आदिक शर्मा, सक्षम कडू, आयुष जामनिक, सान्वी इंगोले, प्रांजली गनवीर, नंदिनी, देवांश भांडे, नंदिनी परोकार, मधुरा लोडम, चिन्मय राजूरकर, सूर्यांश गोपकर, जानवी काळे, कार्तिक लोकपुरे व रुद्र भारती यांच्यासह संघातील अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
यशस्वी खेळाडूंचे मुर्तिजापूर येथे स्वागत करण्यात आले. यावेळी भारती शर्मा, धनराज वानखडे, अशोक कांबळे, ऋतिक पांडव, कार्तिक लोकपुरे व नंदिनी वरोकार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
खेळाडूंना एम.बी. कराटे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख व अध्यक्ष गंगाधर जाधव तसेच सहप्रशिक्षक समीर जाधव यांनी प्रशिक्षण दिले. यासाठी राजू महाजन यांनी सहकार्य केल्याची माहिती देण्यात आली.

