Married woman molested: शहरातील लिलाव भवनसमोर एका विवाहित महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उशिरा रात्री घडली. या प्रकाराला महिलेच्या पतीने जाब विचारताच आरोपीने त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दाखल 29 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लिलाव भवनसमोर संतापजनक प्रकार; विवाहितेशी गैरवर्तन, पतीवर हल्ला
देऊळगाव राजा : शहरातील लिलाव भवनसमोर एका विवाहित महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उशिरा रात्री घडली. या प्रकाराला महिलेच्या पतीने जाब विचारताच आरोपीने त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दाखल 29 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 1 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजताच्या सुमारास त्या आपल्या पतीसमवेत मेडिकलकडे जात असताना लिलाव भवनसमोर ही घटना घडली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अल्केश रामराव तुऱ्हे (रा. जालना, ता. जि. जालना) याने त्यांचा वाईट उद्देशाने हात धरून “तू गाडीवर बसून जालना येथे चल” असे म्हटले. हा प्रकार पाहून फिर्यादीच्या पतीने आरोपीला “माझ्या पत्नीचा हात का धरला?” असा जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीच्या पतीला चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “तुम्हाला मारून टाकू” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या तोंडी फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अप क्रमांक 301/2026 नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 115(2), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास एएसआय नारायण गिते करीत असून घटनेमागील नेमका हेतू, आरोपीची पार्श्वभूमी तसेच परिसरातील साक्षीदारांची माहिती याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

