Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Manohar Ingle : मनोहर इंगळे यांना ‘कृती गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार

Manohar Ingle : बी. एस. एफ. बहुउद्देशीय संस्था, अमरावती; संत कबीर बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा; संकल्प बहुउद्देशीय संस्था, अकोला व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ डिसेंबर रोजी साई गजानन मंगल कार्यालय, आनंद सागरजवळ, शेगाव येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Manohar Ingle
अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती कार्याची राज्यस्तरावर दखल

राहुल सोनोने

दिग्रस बु. : बी. एस. एफ. बहुउद्देशीय संस्था, अमरावती; संत कबीर बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा; संकल्प बहुउद्देशीय संस्था, अकोला व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ डिसेंबर रोजी साई गजानन मंगल कार्यालय, आनंद सागरजवळ, शेगाव येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात चमत्कारामागील विज्ञानाचे सप्रयोग प्रबोधन तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बाळापूर तालुका संघटक मनोहर इंगळे यांना प्रसिद्ध साहित्यिक सतीश शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन ‘कृती गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक अमोल जाधव (नाशिक) होते. मुख्य आयोजक तथा उपेक्षित नायक न्यूजचे संपादक भूषण सरदार होते. यावेळी मंत्रालयाचे अतिरिक्त स्वीय सहाय्यक जगदीश पवार, प्रसिद्ध रिल्स स्टार संध्या पहुरकर, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, समाजसेविका वैशाली सोनवणे (नाशिक), दिग्दर्शक इंजि. डी. एन. इंगळे (बुलढाणा), समाजसेवक व वृक्षसंरक्षक डॉ. रावसाहेब घोडेराव, प्रसिद्ध मॉडेल ऋतुजा लुटडे, राजेंद्र हेलोडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रसिद्ध निवेदिका व साहित्यिक अश्विनी सांगळे यांनी केले. सुरुची भोजनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top