encroachment : वाडेगाव येथील मागील पंचवीस वर्षांपासून अतिक्रमणात अडकलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र या कारवाईमुळे काही नागरिकांमध्ये नाराजीचाही सूर उमटला आहे.

वाडेगावात समाधानाची भावना, काहींची नाराजी
राहुल सोनोने
वाडेगाव :वाडेगाव येथील मागील पंचवीस वर्षांपासून अतिक्रमणात अडकलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र या कारवाईमुळे काही नागरिकांमध्ये नाराजीचाही सूर उमटला आहे.
वाडेगाव येथील सेंट्रल बँकेलगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने मागील सुमारे २० वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद होती. या अतिक्रमणप्रकरणी संबंधित अतिक्रमणधारक व ग्राम प्रशासन यांच्यात वाद निर्माण होऊन हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट होते. सर्व बाबींचा सखोल विचार करून दिनांक २५ ऑक्टोबर रोजी अप्पर आयुक्तांनी संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश ग्राम प्रशासनाला दिले.
या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक २० डिसेंबर रोजी ग्राम प्रशासनाकडून संबंधित रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
अतिक्रमण हटविताना सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य मुजाहीद भाई, सुनील मानकर, डॉ. शेख चांद, प्रकाश मसने तसेच ग्रामविकास अधिकारी रवींद्र इंगळे उपस्थित होते. या कारवाईमुळे अनेक ग्रामस्थांनी ग्राम प्रशासनाच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

