A cement dam : खडका शिवारातील अल्पभूधारक महिला शेतकऱ्याच्या शेतात विना परवानगी सिमेंट नाला बांध केल्याने होत असलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराला कंटाळून अखेर संबंधित महिला शेतकऱ्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.विमल विनायक वायाळ रा. मनुबाई यांनी उपोषण सुरू केला आहे.

नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून होतेय टाळाटाळ
देऊळगाव राजा : खडका शिवारातील अल्पभूधारक महिला शेतकऱ्याच्या शेतात विना परवानगी सिमेंट नाला बांध केल्याने होत असलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराला कंटाळून अखेर संबंधित महिला शेतकऱ्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.विमल विनायक वायाळ रा. मनुबाई यांनी उपोषण सुरू केला आहे.
सिमेंट नाला बांध विमल विनायक वायाळ या महिला शेतकऱ्याच्या शेतात शेतकऱ्याच्या संमतीशिवाय करण्यात आला आहे. या सिमेंट बांधाचे काम दर्जेदार नसल्याने त्यातील पाणी वायाळ यांच्या शेतात जाते. त्यामुळे त्यांची जमीन चिभळली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या सिमेंट नाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याच्या मागणीसाठी 20 ऑगस्ट 2024 रोजी आपण उपोषण केले होते. यावेळी जलसंधारण अधिकारी लाकडे यांनी तोंडी आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर महिला शेतकऱ्याने उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणात उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार जिल्हास्तरीय कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती विलास लाकडे, उपविभागीय अभियंता, मृदा संधारण कार्यालय, देऊळगाव राजा यांनी दिली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

