Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

40 pigs stolen : देऊळगाव राजात मोठी चोरी; बंदिस्त शेडमधून ४० वराह लंपास, ७० हजारांचा मुद्देमाल चोरीस

40 pigs stolen : देऊळगाव राजा शहरातील साईनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंदिस्त शेडचे कुलूप तोडून तब्बल ४० वराह चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

40 pigs

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा शहरातील साईनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंदिस्त शेडचे कुलूप तोडून तब्बल ४० वराह चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितसिंग जिवनसिंग बावरे (वय ५०, व्यवसाय – वराह पालन, रा. दुर्गापुरा, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजितसिंग बावरे यांनी त्यांच्या मालकीच्या प्लॉटवर टिनपत्र्याचे बंदिस्त शेड उभारले असून, त्यामध्ये सुमारे ६० वराह पाळले होते. दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टिनपत्र्याच्या शेडच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्यामधील ४० वराह (अंदाजे किंमत ७० हजार रुपये) चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सदर गुन्हा दि. १७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.४२ वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड यांनी दाखल केला आहे. या घटनेचा तपास देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत. दरम्यान, शहराच्या वस्तीतील परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वराह चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top