Mahabreaking

🔴 BREAKING
child marriage :बालविवाह लावल्यास थेट गुन्हे, लग्नात सहभागी झाल्यास वऱ्हाडी, भटजी, वाजंत्रीही येणार गोत्यात the two factions of the Shiv Sena :शिवसेनेच्या दोन गटात अंतर्गत खदखद वाढली, वर्चस्वाच्या लढाईमुळे कार्यकर्त्यांत नाराजी MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized : अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; १३.८० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त Heatwave Warning: उष्ण लाटेचा इशारा ; आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन 31 Students from Januna  :जनुना गावच्या ३१ विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत झेंडा, ग्रामस्थांनी केला सत्कार    Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड child marriage :बालविवाह लावल्यास थेट गुन्हे, लग्नात सहभागी झाल्यास वऱ्हाडी, भटजी, वाजंत्रीही येणार गोत्यात the two factions of the Shiv Sena :शिवसेनेच्या दोन गटात अंतर्गत खदखद वाढली, वर्चस्वाच्या लढाईमुळे कार्यकर्त्यांत नाराजी MD Drugs Worth ₹13.80 Lakh Seized : अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; १३.८० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त Heatwave Warning: उष्ण लाटेचा इशारा ; आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन 31 Students from Januna  :जनुना गावच्या ३१ विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत झेंडा, ग्रामस्थांनी केला सत्कार    Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड

Illegal sand mining :खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उपसा; दोन बोटींसह २७.२० लाखांचा मुद्देमाल नष्ट, अज्ञातांविरुद्ध गुन्हा

Illegal sand mining : तालुक्यातील मेव्हणा राजा शिवारात असलेल्या खडकपूर्णा (संत चोखामेळा) जलाशयात शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेती उपसा करून चोरी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन बोटींसह सुमारे २७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल शासकीय पंचासमक्ष नष्ट करण्यात आला असून, अज्ञात बोट चालक व मालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal sand mining

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : तालुक्यातील मेव्हणा राजा शिवारात असलेल्या खडकपूर्णा (संत चोखामेळा) जलाशयात शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेती उपसा करून चोरी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन बोटींसह सुमारे २७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल शासकीय पंचासमक्ष नष्ट करण्यात आला असून, अज्ञात बोट चालक व मालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खडकपूर्णा जलाशय परिसरात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान अज्ञात बोट चालक व अज्ञात मालक हे त्यांच्या मालकीच्या दोन बोटींच्या साहाय्याने जलाशयातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरी करत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी अवैध रेती व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेला एकूण २७,२०,००० रुपयांचा मुद्देमाल शासकीय पंचनामा करून नष्ट करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.५३ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.किरण  पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या निर्देशानुसार खडकपूर्णा जलाशय परिसरात अवैध रेती उपसा व उत्खनन करणाऱ्यांविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त अधिपत्याखाली धडक कारवाई राबविण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि ब्रम्हा गिरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, महसूल मंडळ अधिकारी विजय हिरवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास गीते, पोलीस हवालदार रामकिसन गीते,माधव कुटे, विजय दराडे,पोका ज्ञानेश्वर, वायाळ प्रवीण, गजानन काकड,कालवा निरीक्षक भगवान खारडे, सुरक्षा रक्षक पुरुषोत्तम भागिले तसेच महसूल सेवक शरद काकडे  यांच्या पथकाने केली.
दरम्यान, जलाशय परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे पर्यावरणासह शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने अशा कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top