Mahabreaking

[breaking_news]

Ganesh Kale :महाराष्ट्र शासनाकडून युवा शेतकरी गणेश काळे यांचा सन्मान; अमरावती विभागासाठी अभिमानाची बाब

Ganesh Kale : बाळापूर तालुक्यातील तामशी येथील प्रगतशील युवा शेतकरी गणेश जगन्नाथ काळे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘युवा शेतकरी पुरस्कार-2023’ प्रदान करून गौरविण्यात आले. १ जुलै, कृषी दिनानिमित्त मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) डोम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

Ganesh Kale

  तामशीच्या प्रगतशील शेतकऱ्याला ‘युवा शेतकरी पुरस्कार’; राज्यपालांच्या हस्ते गौरव

राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील तामशी येथील प्रगतशील युवा शेतकरी गणेश जगन्नाथ काळे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘युवा शेतकरी पुरस्कार-2023’ प्रदान करून गौरविण्यात आले. १ जुलै, कृषी दिनानिमित्त मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) डोम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

गणेश काळे यांनी शेळीपालन, वर्मी कंपोस्ट निर्मिती, विविध पिकांची लागवड, उत्पादनांचे पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रसार या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना अमरावती विभागातून युवा शेतकरी पुरस्कारासाठी निवडले.

या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी सचिव परिमल सिंह तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेश काळे यांच्या सन्मानामुळे अमरावती विभागासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून, बाळापूर तालुक्यासह परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करून त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

त्यांच्या या यशामुळे तामशी गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, प्रगतशील शेतीच्या माध्यमातून युवकांनीही शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असा संदेश त्यांच्या कार्यातून मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top