Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Maha Arogya Samman :‘महा आरोग्य सन्मान-2026’ने वैद्यकीय अधीक्षक डॉ. रिज़वाना बेगम खान सन्मानित

Maha Arogya Samman : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, बाळापूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रिज़वाना बेगम खान यांना त्यांच्या उत्कृष्ट, समर्पित व अनुकरणीय कार्यासाठी “महा आरोग्य सन्मान-2026” प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय समारंभात मा. प्रकाश आबिटकर, मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मा. मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) विशेष उपस्थित होत्या.

Maha Arogya Samman
ग्रामीण रुग्णालय, बाळापूरच्या सेवाभावाला राज्यस्तरीय गौरव

जाकीर अहमद 

बाळापूर : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, बाळापूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रिज़वाना बेगम खान यांना त्यांच्या उत्कृष्ट, समर्पित व अनुकरणीय कार्यासाठी “महा आरोग्य सन्मान-2026” प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय समारंभात मा. प्रकाश आबिटकर, मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मा. मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) विशेष उपस्थित होत्या.

डॉ. रिज़वाना बेगम खान यांनी सार्वजनिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण, व्यापक जनजागृती मोहिमा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना तसेच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा विस्तार या क्षेत्रांत दिलेले योगदान उल्लेखनीय व प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय, बाळापूरने मर्यादित साधनसंपत्तीमध्येही सेवा, संवेदना आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. मातृ व बाल आरोग्य, लसीकरण, पोषण, स्वच्छता, रोगप्रतिबंध, नियमित आरोग्य शिबिरे तसेच आपत्कालीन सेवांमध्ये झालेली लक्षणीय सुधारणा त्यांच्या कार्यकाळाची वैशिष्ट्ये ठरली आहेत.

समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, मानवी दृष्टिकोन आणि अखंड सेवाभावामुळे परिसरातील आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावली असून, शासकीय आरोग्य व्यवस्थेबद्दलचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. या यशाचे श्रेय डीडी सर, सीएस मॅडम तसेच ग्रामीण रुग्णालय, बाळापूर येथील सर्व कर्मचारीवर्गाला जाते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, संघभावना आणि समर्पित सेवेमुळेच हा गौरव प्राप्त झाला आहे.

“महा आरोग्य सन्मान-2026” हा डॉ. रिज़वाना बेगम खान यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समाजकल्याणाप्रती असलेल्या निष्ठेची राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या सन्मानामुळे बाळापूरसह संपूर्ण अकोला जिल्ह्यात आनंद व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य संस्थांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच नागरिकांनी त्यांचे व संपूर्ण आरोग्य पथकाचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top