Mahabreaking

[breaking_news]

Lured away under :जेवणाच्या बहाण्याने नेले अन् संपवला जीव; पिंपरी सरहद्दीतील हत्याकांडाने खळबळ

Lured away under : जुन्या वादाच्या कारणावरून २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी सरहद्दीतील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Lured away under

जुन्या वैमनस्याची रक्तरंजित परिणती; २४ वर्षीय युवकाचा खून, चौघे जेरबंद

रिसोड : जुन्या वादाच्या कारणावरून २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी सरहद्दीतील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृतकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  अभिषेक विष्णू वाघ (वय २४, रा. उकीरखेड, ता. रिसोड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आनंद विनोद मवाळ, प्रतीक संतोष हुंबाळ, पवन गजानन दांदडे (सर्व रा. महागाव, ता. रिसोड) तसेच शुभम शेषराव अवचार (रा. अंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

add

फिर्यादी विष्णू वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आनंद मवाळ याच्या वडिलांसोबत सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. तसेच आनंद मवाळ हा अभिषेकला आपल्या वाहनावर काम करण्यासाठी वारंवार बोलावत होता. मात्र अभिषेकने त्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी १८ जून रोजी अभिषेकला जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगितले. त्यानंतर त्याला पिंपरी सरहद्दीतील बळीराजा पेट्रोलपंपाजवळ नेण्यात आले. तेथे चौघांनी संगनमत करून कोणत्यातरी जड हत्याराने अभिषेकच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला प्रथम छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी रुग्णालयात असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास काहीसा विलंब झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

add

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक इमरानखान पठाण करीत आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक केशव वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top