Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Local Crime Branch raids :स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तलवार, वाहनासह 1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

Local Crime Branch raids :जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, त्यांची चोरटी वाहतूक तसेच वरली मटका व इतर जुगारधंद्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तलवार, चारचाकी वाहन, रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 4 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Local Crime Branch raids
देऊळगाव राजा, पातुर्डा बु व लोणार येथे एलसीबीची कारवाई; तलवार, कार व रोख रक्कम जप्त

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, त्यांची चोरटी वाहतूक तसेच वरली मटका व इतर जुगारधंद्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तलवार, चारचाकी वाहन, रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 4 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून कारवाई सुरू केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे 9 मार्च 2026 रोजी देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत जनता जिनिंगसमोर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी राहुल भास्कर झोरे (वय 33, रा. माळीपुरा, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील MH-12-GF-8067 या चारचाकी वाहनातून गुप्ती तलवार आढळून आली. पोलिसांनी आरोपीकडून 1,000 रुपयांची गुप्ती तलवार व 1 लाख रुपयांची चारचाकी कार असा एकूण 1,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार कायद्याखाली तामगाव व लोणार पोलीस स्टेशन हद्दीत तीन स्वतंत्र कारवाया केल्या. तामगाव पोलीस हद्दीतील पातुर्डा येथील मच्छी मार्केटमध्ये ‘तितली भवरा’ जुगारावर छापा टाकून भिमराव श्रावण खंडेराव (वय 55, रा. पातुर्डा खु., ता. संग्रामपूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच पातुर्डा येथील आठवडी बाजारात वरली मटका जुगारावर कारवाई करून बाळकृष्ण सोनाजी भानगे (वय 50, रा. पातुर्डा, ता. संग्रामपूर) याला पकडून मटका साहित्य व रोख रक्कम मिळून 1,455 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय लोणार बसस्थानकाजवळ वरली मटका जुगारावर कारवाई करत अलियार खान बशारत खान (वय 42, रा. आझादनगर, लोणार) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मटका साहित्य व 1,105 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या सर्व कारवायांमध्ये एक गुप्ती तलवार (1,000 रुपये), एक चारचाकी वाहन (1,00,000 रुपये) तसेच जुगार साहित्य व रोख रक्कम 3,860 रुपये असा एकूण 1,04,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या पोउपनि. पंकज सपकाळे, पोउपनि, प्रताप बाजड, सफौ. राजेंद्र अंभोरे, सफौ, ओमप्रकाश सावळे, पोहेकॉ. शरद गिरी, पोहेकॉ. एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. अमोल शेजोळ, दिपक वायाळ, अजीस परसुवाले, मनोज खरडे, निलेश राजपूत, मपोकॉ. पूजा जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top