Mahabreaking

[breaking_news]

Leopard spotted : कपाशीच्या शेतात बिबट्याचे दर्शन; कापूस वेचणाऱ्या महिलांची उडाली तारांबळ!

Leopard spotted : साखरखेर्डा परिसरातील पिंपळगाव सोनारा आणि तांदुळवाडी शिवारात बिबट्याचा वावर पुन्हा दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी शेतात कापूस वेचणीचे काम करणाऱ्या महिलांना कपाशीच्या शेतात बिबट्या बसलेला दिसल्याने एकच खळबळ उडाली. महिलांनी आरडाओरड करून इतर शेतकऱ्यांना सावध केले. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांनी केले आहे.

Leopard

  साखरखेर्डा परिसरात बिबट्याची दहशत कायम; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

साखरखेर्डा  : साखरखेर्डा परिसरातील पिंपळगाव सोनारा आणि तांदुळवाडी शिवारात बिबट्याचा वावर पुन्हा दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी शेतात कापूस वेचणीचे काम करणाऱ्या महिलांना कपाशीच्या शेतात बिबट्या बसलेला दिसल्याने एकच खळबळ उडाली. महिलांनी आरडाओरड करून इतर शेतकऱ्यांना सावध केले. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांनी केले आहे.

साखरखेर्डा, पिंपळगाव सोनारा आणि तांदुळवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही बिबट्याने रोही (नीलगाय) या वन्यप्राण्याची शिकार केली होती. सोमवारी दुपारी कृष्णा काकडे हे पत्नी आणि इतर महिलांसह लांडक तळे शिवारातील शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. महिला कपाशी वेचत असताना अचानक त्यांना कपाशीच्या पिकात बिबट्या बसलेला दिसला. बिबट्याला पाहताच महिलांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. महिला आणि पुरुषांनी एकत्रित आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून तांदुळवाडी शिवाराच्या दिशेने धूम ठोकली, अशी माहिती कृष्णा काकडे यांनी दिली.

यापूर्वी महिनाभरापूर्वी मारोती साखरे यांच्या शेतातही बिबट्या आढळून आला होता. त्यावेळी त्याने रोही (नीलगाय) या वन्यप्राण्याची शिकार केली होती. तसेच मोहाडी, शिंदी, राताळी आणि सवडद या परिसरातही बिबट्या वारंवार फिरताना दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कापूस वेचणीचा हंगाम सुरू असून, मोठ्या प्रमाणात महिला मजूर शेतात कापूस वेचणीसाठी जात आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याचा वाढता वावर शेतकरी आणि शेतमजुरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कापूस वेचणी करताना महिलांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, समूहाने काम करावे आणि परिसरात सतर्क राहावे, अशी गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे या भागातील रोही आणि हरिण यांसारखे वन्यप्राणीही परिसरातून स्थलांतरित झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top