Mahabreaking

[breaking_news]

Legal awareness workshop :समर्थ फार्मसी कॉलेजमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा; विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्वाचे धडे

Legal awareness workshop : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) अंतर्गत DAWN (Drug Awareness and Wellness Navigation) योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

Legal awareness workshop

‘व्यसनमुक्ती, कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक जबाबदारी’ विषयांवर समर्थ कॉलेजमध्ये मार्गदर्शन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) अंतर्गत DAWN (Drug Awareness and Wellness Navigation) योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे तसेच सहसचिव व आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासात्मक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. याच उपक्रमांच्या मालिकेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा व बुलढाणा जिल्ह्यातील विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. डी. विणकर, उपाध्यक्षा अॅड. विजयलक्ष्मी घुले (विघ्णे), सचिव अॅड. मनीष कापसे, सहसचिव अॅड. एस. वाय. शाह तसेच अॅड. सदानंद वाघ यांचा समावेश होता.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कायदा आणि सुव्यवस्था, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, सामाजिक शिस्त आणि कायद्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, करिअर आणि समाजहिताच्या कार्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल ताठे यांच्या सूचनेनुसार आणि उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम लड्डा, विभागप्रमुख प्रा. किशोर चराटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर चराटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कायदेविषयक ज्ञानाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top