Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Land donation for knowledge : ज्ञानासाठी भूदान! पांगरी जि.प. शाळेला डोणगावकर परिवाराचे ५ गुंठे जमीनदान

Land donation for knowledge :शिक्षणासाठी केलेले दान हे सर्वात पवित्र दान मानले जाते, याची प्रचिती देणारी प्रेरणादायी घटना पांगरी येथे घडली. जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या वाढीव जागेच्या समस्येवर उपाय म्हणून डोणगावकर परिवाराने तब्बल ५ गुंठे जमीन शाळेस दान दिली. या उदात्त निर्णयामुळे पांगरी गावात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Land donation for knowledge

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : शिक्षणासाठी केलेले दान हे सर्वात पवित्र दान मानले जाते, याची प्रचिती देणारी प्रेरणादायी घटना पांगरी येथे घडली. जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या वाढीव जागेच्या समस्येवर उपाय म्हणून डोणगावकर परिवाराने तब्बल ५ गुंठे जमीन शाळेस दान दिली. या उदात्त निर्णयामुळे पांगरी गावात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
९ मार्च २०२६ हा दिवस पांगरीसाठी ऐतिहासिक ठरला. जि.प. उच्च प्राथमिक शाळेत सध्या इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सुमारे १७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेचा परिसर केवळ ४ आर जागेत मर्यादित असल्याने आठ वर्गखोल्या, स्वच्छतागृह, किचनशेड, आयसीटी लॅब आणि एपीजे अब्दुल कलाम लॅब यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी व उपक्रमांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती.
इतिहासात पाहिले तर सन १९४९ मध्ये स्व. छोटूलाल सावजी डोणगावकर यांनी इयत्ता १ ते ४ साठी शाळेसाठी जमीन दान केली होती. त्याच दानपरंपरेचा वारसा पुढे नेत त्यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिक्षणासाठी उदारपणे पुढाकार घेतला.
शाळेला नुकतीच फ्युचरिस्टिक क्लासरूम (भविष्यवेधी वर्गखोली) मंजूर झाली असून त्यासाठी प्रशस्त जागेची आवश्यकता होती. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी एकत्र येत यासाठी प्रयत्न सुरू केले. सरपंच दिनकर वाघ व समितीचे अध्यक्ष भरत वाघ यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी चर्चा करून शाळेला लागून असलेल्या डोणगावकर परिवाराशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत या परिवाराने मोठ्या मनाने ५ गुंठे जमीन भूदान देण्याचा निर्णय घेतला.
यानुसार प्रसन्न वर्धमान डोणगावकर, सुजीत वर्धमान डोणगावकर, स्मिता नवीनचंद्र मुधोळकर आणि वैशाली अजय संगई या भावंडांनी शाळेलगतची जमीन अधिकृत Land donation for knowledgeनोंदणीद्वारे शाळेला दान दिली. देऊळगाव राजा येथील सहनिबंधक कार्यालयात ही प्रक्रिया पूर्ण झाली. या वेळी नवीनचंद्र मुधोळकर व अजय संगई यांचीही उपस्थिती होती.
या भूदानाच्या निमित्ताने डोणगावकर परिवाराचे गावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शाळेत प्रवेश करताच फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांच्या हस्ते डोणगावकर परिवाराचा शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल जाधव यांनी शाळेची परिस्थिती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत माहिती देत डोणगावकर परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी आपल्या भाषणात विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचा उल्लेख करत ज्ञानासाठी केलेले भूदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले.
डोणगावकर परिवारासाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. विद्यार्थ्यांचे कौशल्य व शाळेचे उपक्रम पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि पुढेही शाळेसाठी शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत वाघ, माजी सरपंच विठ्ठल वाघ, नामदेव वाघ, ज्ञानेश्वर वाघ, हरीभाऊ वाघ, जयकुमार वाघ, बद्रीभाऊ वाघ, विजय वाघ, तानाजी गिराम, ध्रुव वाघ, गणेश वाघ, नारायण आंतरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक रमेश भानुसे, विजय जावळे, कृष्णा रायमल, धर्मराज मुंडे, शोभा मंडळकर, मालता चाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रामेश्वर कुटे यांनी केले तर आभार हरिभाऊ वाघ यांनी मानले. ज्ञानासाठी केलेल्या या भूदानामुळे पांगरी गावात “देण्यातच खरा आनंद असतो” या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top