Mahabreaking

[breaking_news]

Zilla Parishad :सेसफंड योजनेंतर्गत लाभार्थी निवड १२ मार्चला; जिल्हा परिषदेत ईश्वर चिठ्ठी पद्धतीने प्रक्रिया

Zilla Parishad :समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने २० टक्के सेसफंड योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ५ एच.पी. विद्युत मोटार पंप, तर मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

Zilla Parishad

 बुलढाणा : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने २० टक्के सेसफंड योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ५ एच.पी. विद्युत मोटार पंप, तर मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

या योजनांसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या परिपूर्ण अर्जांमधून लाभार्थींची निवड ईश्वर चिठ्ठी पद्धतीने करण्यात येणार आहे.

लाभार्थी निवड प्रक्रिया १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

या योजनांसाठी अर्ज सादर केलेल्या सर्व लाभार्थी व अर्जदारांनी निवड प्रक्रियेच्या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद यंडोले यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top