Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

Kisanrao Gawande  : बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किसनराव गावंडे यांची अविविरोध निवड

Kisanrao Gawande  : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किसनराव लक्ष्मणराव गावंडे यांची मंगळवारी अविविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेत कोणताही विरोधी उमेदवार नसल्याने गावंडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Kisanrao Gawande

राहुल सोनोने 

दिग्रस बू  : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाभुळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी किसनराव लक्ष्मणराव गावंडे यांची मंगळवारी अविविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेत कोणताही विरोधी उमेदवार नसल्याने गावंडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणूक कार्यक्रमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच मिरा संजय पाचपोर, माजी उपसरपंच अर्चनाताई किशोर धाडसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये हरिदास पाचपोर, श्रीमती विद्याताई सुभाष धाडसे, रमेश डहाळे, ॲड. संदेश धाडसे, गंगाताई निवृत्ती भालतिलक, निताताई नारायणराव भगत, अलकाबाई रजघास घोसले, पूजाताई ज्ञानेश्वर खरडे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता.

यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय पाचपोर, तसेच महादेवराव गावंडे, रवि खडसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल गावंडे, पांडूरंगजी भगत, विनायकराव पाचपोर, किसन खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, निवृत्तीभाऊ भालतिलक, नारायणराव भगत, गोपाल गायकवाड, शांताराम जाधव, प्रमोद धाडसे, रणजित डाबेराव, सुमित गावंडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री. एन. एस. इंगळे यांनी कामकाज पाहिले, तर सहाय्यक म्हणून महेश गावंडे यांनी सहकार्य केले.

उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर किसनराव गावंडे यांचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना गावंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top