Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Subhash Gavai :काष्ट्राईब शिक्षक संघटनेची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी सुभाष गवई

Subhash Gavai :काष्ट्राईब शिक्षक संघटनेची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी २२ मार्च रोजी दुसरबीड येथे जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Subhash Gavai

साखरखेर्डा : काष्ट्राईब शिक्षक संघटनेची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी २२ मार्च रोजी दुसरबीड येथे जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस प्रमुख म्हणून राज्य उपाध्यक्ष दिलीप दादा खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप वानखडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय जाधव व सुभाष पडघान उपस्थित होते.

सभेत राज्य उपाध्यक्ष दिलीप दादा खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या मतांचा विचार करून सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी सुभाष गवई, तर कार्याध्यक्षपदी सचिन डोंगरदिवे यांची नियुक्ती केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विभागीय केंद्र समन्वयक परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल अजय आढाव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल साळवे यांनी केले. सभेला सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी संतोष सरकटे, प्रदीप मोरे, बबन इंगळे, अरुण गवई, अनिल झोटे, सिद्धार्थ मस्के, मनोज जाधव, दीपक थोरवे, प्रदीप कंकाळ, दीपक इंगळे, अमोल इंगळे व सुनील पडघान आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top