Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Madrasa Jame Ulum, Balapur :मदरसा जामे उलूम, बाळापूर येथे शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी प्रवेश 29 मार्चपासून सुरू!

Madrasa Jame Ulum, Balapur :अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक बाळापूर शहरातील मदरसा जामे उलूम लिलबनीन वल बनात या शैक्षणिक संस्थेत शैक्षणिक वर्ष 2026–2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मदरसा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया 29 मार्च 2026 पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी वेळेत संपर्क साधून निश्चित तारखेला मदरशात उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Madrasa Jame Ulum, Balapur

धार्मिक व आधुनिक शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र; मुला-मुलींसाठी विविध विभागांत प्रवेश उपलब्ध

ज़ाकीर अहमद

बाळापूर : अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक बाळापूर शहरातील मदरसा जामे उलूम लिलबनीन वल बनात या शैक्षणिक संस्थेत शैक्षणिक वर्ष 2026–2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मदरसा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया 29 मार्च 2026 पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी वेळेत संपर्क साधून निश्चित तारखेला मदरशात उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदरसा जामे उलूम, बाळापूर हा संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात धार्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मदरसा व शाळेचे संपूर्ण शिक्षण आणि संस्कार दिले जातात. त्यामुळे ही संस्था पालक व संरक्षकांसाठी विश्वासाचे केंद्र बनली आहे.

मदरशातील विविध विभागांमध्ये दिनी शिक्षण विभाग, हिफ्ज-ए-कुरआन विभाग, आलिमियत (दौर-ए-हदीसपर्यंत), तकमील-ए-इफ्ता शाखा, उर्दू माध्यम शाळा तसेच इंग्रजी भाषा व साहित्याचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. या सर्व विभागांमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक ज्ञानासोबत आधुनिक काळाच्या गरजेनुसार शिक्षण दिले जाते, ज्यामुळे ते भविष्यात समाजाचे जबाबदार व सुसंस्कारित नागरिक बनू शकतात.

मदरसा प्रशासनाने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती केली आहे की, प्रवेशाच्या वेळी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड तसेच दोन पासपोर्ट साईज छायाचित्रे अनिवार्य आहेत. आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी मदरसा प्रशासनाशी थेट संपर्क साधावा. यासाठी मुफ्ती मोहम्मद अहमद कासमी आणि मौलाना खुर्शीद अहमद कासमी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मदरशाचे महतमिम व शेखुल हदीस मुफ्ती मोहम्मद असलम कासमी बस्तवी यांनी पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच उत्तम धार्मिक व नैतिक शिक्षणासाठी त्यांना मदरसा जामे उलूम, बाळापूर येथे प्रवेश द्यावा, जेणेकरून नव्या पिढीला ज्ञान व सदाचाराच्या प्रकाशाने समृद्ध करता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top