Mahabreaking

[breaking_news]

Janefal police deal :जानेफळ पोलिसांचा अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर घणाघात; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Janefal police deal : अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशन जानेफळने धडक मोहीम राबवत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Janefal police deal

वडाळी-पारखेडमध्ये हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड; ३०० लिटर मोहा सडवा नष्ट

मेहकर : अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशन जानेफळने धडक मोहीम राबवत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधित दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई ग्राम वडाळी (ता. मेहकर) येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपी लक्ष्मण शालीग्राम लठाड (वय ३६) याच्या ताब्यातून ७ लिटर हातभट्टी दारू, १०० लिटर गुळमिश्रित मोहा सडवा तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ७ हजार १५० रुपये असून याप्रकरणी पोलीस स्टेशन जानेफळ येथे गुन्हा क्र. २०६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर ग्राम पारखेड येथे दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत श्रीचंद मांगु जाधव (वय ५१) याच्या ताब्यातून १० लिटर हातभट्टी दारू, २०० लिटर गुळमिश्रित मोहा सडवा आणि दारू निर्मितीचे साहित्य असा एकूण १२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्र. २०८/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण १७ लिटर हातभट्टी दारू, ३०० लिटर मोहा सडवा आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा साठा नष्ट करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

ही मोहीम पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा निकम, विष्णू जगताप आणि पोलीस अंमलदार माधव काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना गोपनीयपणे द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top