Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Intrusion and Assault at Revenue Office :महसूल कार्यालयात शिरुन मारहाण; कर्मचाऱ्याला धमक्या, कागदपत्रांची तोडफोड

Intrusion and Assault at Revenue Office :तालुक्यातील तुळजापूर वर्क स्टेशन येथे महसूल कार्यालयात काम सुरू असताना एका व्यक्तीने अचानक घुसून महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Intrusion and Assault at Revenue Office
देऊळगाव राजा : तालुक्यातील तुळजापूर वर्क स्टेशन येथे महसूल कार्यालयात काम सुरू असताना एका व्यक्तीने अचानक घुसून महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी बावरा येथील रहिवासी रामप्रसाद शिवाजी शेरे (वय ३५), हे महसूल सेवक म्हणून कार्यरत असून २४ मार्च रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता ते महसूल अधिकारी बबन काकड व सहकारी गजानन शेळके यांच्यासह तुळजापूर वर्क स्टेशन येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करत होते.
याचवेळी विष्णू सर्जेराव म्हस्के (रा. बोराखेडी बावरा) हा अचानक कार्यालयात येऊन महसूल अधिकाऱ्यांच्या टेबलवर थाप मारत आक्रमक पवित्रा घेतला. सुरुवातीला वाद घालत त्याने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल सेवक रामप्रसाद शेरे यांनाही त्याने लक्ष्य करत शिवीगाळ केली. प्रसंग चिघळताच आरोपीने शेरे यांच्यावर चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांच्या शर्टाचा कॉलर पकडून ओढत जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, आरोपीने कार्यालयातील महत्त्वाचे शासकीय कागदपत्रे, सर्वे अहवाल फाडून टाकत कामकाजात अडथळा निर्माण केला. “माझ्या नादाला लागू नका, तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे,” अशी धमकी देत त्याने दहशत माजवली.
या घटनेप्रकरणी पीडित कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनला तोंडी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. सरकारी कार्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top