Mahabreaking

[breaking_news]

Santosh Khade :महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात करा :संतोष खाडे 

Santosh Khade :महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात केले तर जिवनाचे सार्थक झाले. म्हणून आज मी या ठिकाणी आहे. युवकांनी सुध्दा महापुरुषांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी साखरखेर्डा येथील शांतता बैठकीत केले .

Santosh Khade

 साखरखेर्डा येथे शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

साखरखेर्डा :  महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांचे विचार आत्मसात केले तर जिवनाचे सार्थक झाले. म्हणून आज मी या ठिकाणी आहे. युवकांनी सुध्दा महापुरुषांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनी साखरखेर्डा येथील शांतता बैठकीत केले .

देऊळगाव मही येथे महसूल समाधान शिबिरात ७० प्रमाणपत्रांचे वितरण

११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे शांतता बैठकीचे आयोजन ठाणेदार गजानन करेवाड यांनी १० एप्रिल रोजी सायंकाळी केले होते. या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे हे अध्यक्षस्थानी होते तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव , पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ठोके , भाजपाचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे , माजी सरपंच कमलाकर गवई , माजी सरपंच सुनील जगताप , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मंडळकर , युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर , माजी उपसरपंच सैय्यद रफीक , रामदाससिंग राजपूत , अर्जून गवई यासह जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष , सदस्य , शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते .

मी अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती असून मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचली आहेत . केवळ वाचली नाहीत तर आत्मसात केली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांनी आपले जीवन समर्पित करुन आपल्यासाठी शिक्षणाची सोय करून ठेवली आहे . त्यांच्या जयंतीनिमित्त आपणही सामाजिक उपक्रम राबवून युवा पिढीला प्रेरणा मिळेल असा आदर्श निर्माण करु असा उपक्रम सुरू करावा असेही खांडे यांनी सांगितले . जयंती साजरी करताना डी जे मुक्त जयंती साजरी करा . आणि गावात शांतता कशी नांदेल यासाठी सातत्याने प्रयत्न करा . असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी सुध्दा गावात शांतता कशी नांदेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . महापुरुषांच्या जयंती महोत्सवात सर्वांनी मिळून मिसळून सहभागी होऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी होत असताना एक आगळा वेगळा आनंद मिळतो . असे विचार यावेळी मांडले . प्रास्ताविक ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले तर संचालन सचिन खंडारे यांनी केले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top