Mahabreaking

[breaking_news]

70 Certificates Distributed :देऊळगाव मही येथे महसूल समाधान शिबिरात ७० प्रमाणपत्रांचे वितरण

70 Certificates Distributed : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर महसुल विभागाच्या वतीने  शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात ७० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

70 Certificates Distributed

देऊळगाव मही : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर महसुल विभागाच्या वतीने  शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते.या शिबीरात ७० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन एस.डी.ओ. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. होते या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार वैशाली डोगरजाळ यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सायली जाधव होत्या. यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून नायब तहसीलदार मुढे, शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक कोरडे, सरपंच पती वसुदेव पाटील, माजी सरपंच उमेश शिगणे, ग्राम महसूल अधिकारी चेके साहेब, मंडळ अधिकारी पंढरीनाथ जायभाये, विनोद डोईफोडे,पत्रकार सुनील मतकर, अनुलोमचे सिदखेडराजा भाग जनसेवक अतिश पान्नासे आदी मान्यवर उपस्थित होते. या समाधान शिबिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रे, निराधार अनुदान योजनेची लाभ प्रमाणपत्रे, तसेच जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत वारस नोंदी झालेल्या खातेदारांना सातबारा, फेरफार व ८-अ उतारे यांसह एकूण ७० विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सदर शिबिरात श्रीमती शिल्पा बंगाळे, समूह आरोग्य अधिकारी यांनी “माझा गाव, आरोग्य संपन्न गाव” या विषयावर उपस्थित महिला वर्गांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रामदास मांटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंजिरी सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पी. टी. जायभाये (मंडळ अधिकारी) तसेच तलाठी ज्ञानेश्वर तांबे, विनोद सांगळे, शिवानंद नागरे व मंजिरी सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध महसूल सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top