Mahabreaking

[breaking_news]

Intensive check: डोणगाव बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची धडक तपासणी; २० वाहनचालकांवर कारवाई

Intensive check: स्थानिक बसस्थानक परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

Intensive check

 विनाहेल्मेट, ट्रिपल सीटसह नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

डोणगाव : स्थानिक बसस्थानक परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हर्षे सहगल आणि पथकाने ही विशेष मोहीम राबविली. डोणगाव बसस्थानक परिसरात वाढती वाहतूक आणि वारंवार घडणारे नियमभंग लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, वाहनाची आवश्यक कागदपत्रे जवळ न बाळगणे, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या २० दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांनी सर्व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. हेल्मेटचा वापर करणे, वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत ठेवणे, वेगमर्यादेचे पालन करणे आणि ट्रिपल सीट प्रवास टाळणे, या बाबी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन डोणगाव पोलिसांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top