Mahabreaking

[breaking_news]

Educational inspection: बोराखेडी बावरा जि.प. शाळेची गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांच्याकडून शैक्षणिक पाहणी

Educational inspection: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोराखेडी बावरा येथे गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या शैक्षणिक कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध वर्गांना भेट देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे निरीक्षण केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या वाचन, लेखन, गणित आणि आकलन क्षमतेची तपासणी केली.

Educational inspection

  विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून गटशिक्षणाधिकाऱ्यांचे समाधान; शिक्षकांच्या कार्याचे कौतुक

गजानन तिडके

देऊळगाव राजा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोराखेडी बावरा येथे गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या शैक्षणिक कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध वर्गांना भेट देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे निरीक्षण केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या वाचन, लेखन, गणित आणि आकलन क्षमतेची तपासणी केली.

पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासातील प्रगती, आत्मविश्वास आणि शिक्षकांची अध्यापन पद्धती समाधानकारक असल्याचे दिसून आल्याने श्री. सपकाळ यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या पालक आणि ग्रामस्थांच्या योगदानाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी मुख्याध्यापिका अपार यांनी पुष्पगुच्छ देऊन गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला श्री. सोनूने, श्री. कायंदे आणि सौ. कावेरी पडघान यांची उपस्थिती होती.

शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांची कार्यतत्परता याबद्दल समाधान व्यक्त करत श्री. सपकाळ यांनी भविष्यातही अशाच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या प्रेरणादायी भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top