Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

Rahulji Nimavat :भारतीय संस्कृती व संस्कार टिकले पाहिजेत – राहुलजी निमावत

Rahulji Nimavat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरा (नागनगाव मंडळ) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिर परिसरात हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह राहुलजी निमावत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

Rahulji Nimavat

सुरा येथे हिंदू संमेलन उत्साहात; परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

सुरा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरा (नागनगाव मंडळ) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिर परिसरात हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह राहुलजी निमावत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. बंडू महाराज चेके तसेच सौ. सविताताई समाधान शिंगणे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान देऊळगाव मही येथील मंडळींनी सादर केलेल्या शिवगीतांनी व भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. भगव्या ध्वजांनी सजलेल्या परिसरात संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना राहुलजी निमावत म्हणाले की, एकत्र कुटुंब पद्धती व कौटुंबिक संस्कार टिकले तर देश आणि संस्कृती टिकेल. भोजन, भाषा, भूषा, भजन, भ्रमण आणि भवन या सर्व बाबींमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले पाहिजे. “भारत माता की जय” म्हणत देशाच्या वैभवासाठी कार्य करणारा प्रत्येकजण हिंदू आहे; मात्र देशविरोधी कृत्य करणारा कोणीही असो, तो देशाचा शत्रूच ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख अतिथी बंडू महाराज चेके यांनी हिंदू धर्माची व्यापकता, कर्तव्यभावना आणि संस्कृती रक्षणाचे महत्त्व यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

यावेळी सविताताई शिंगणे यांनी ‘नारी सुरक्षा’ या विषयावर बोलताना महिलांची वेशभूषा, आचरण तसेच मोबाईलचा सकारात्मक व योग्य उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण विषयक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामराव चेके गुरुजी यांनी केले. या हिंदू संमेलनाला तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या सामूहिक आरतीने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top