Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार

first phase of the Crop Insurance Scheme : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासाठी पीकविमा योजनेतून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख रुपये मिळणार आहेत.

first phase of the Crop Insurance Scheme

सर्वाधिक फटका बसलेल्या नांदेड जिल्ह्याला मिळणार भरघोस मदत

अशोक इंगळे

साखरखेर्डा/ पुणे  : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासाठी पीकविमा योजनेतून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख रुपये मिळणार आहेत. रुपये मिळणार आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात मदत जाहीर करयात आली आहे. यामध्ये  सोयाबीन पिकाचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसानभरपाई येत्या काही दिवसांत मिळेल. त्यामुळे या रकमेत आणखी वाढ होईल, असे सुत्रांनी सांगितले. सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सबंध खरिपात तब्बल ९८ लाख ४३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी १७ हजार रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीकविमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. शेतकऱ्यांचे आलेले उत्पादन कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे. या १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे साडेसात हजार मंडळांची नुकसानभरपाईची माहिती अंतिम झाली. त्याला केंद्र सरकारने तसेच विमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत असल्याने या उर्वरित पाच हजार मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.

 

नुकसानभरपाईची मदत जिल्हानिहाय (आकडे लाखांत)

अहिल्यानगर – ११,८३५.०४

नाशिक – ८७८.७८

चंद्रपूर – २६०.५०

सोलापूर – ६८४.०६

जळगाव – १०६.९५

सातारा – ३६२.१८

परभणी – ६,३७८.०२

वर्धा – ९६१.८२

नागपूर – १९४.७०

जालना – २०९.३३

गोंदिया – ३,१०१.७७

कोल्हापूर – ०.२७

ठाणे – १,७९३.८२

रत्नागिरी – ७.०८

सिंधुदुर्ग – २३.२९

नांदेड – ८१,३३७.९७

संभाजीनगर – २५.०१

भंडारा – ४३३.६८

पालघर – १,५३४.७७

रायगड – १०६.३४

वाशिम – १०९.००

बुलढाणा – ५६४.९८

सांगली – १२७.१४

नंदुरबार – २०९.४१

हिंगोली – ९,८९५.५६

अकोला – १५८.९४

धुळे – १०३.१५

पुणे – १००.०६

अमरावती – २५०.२०

गडचिरोली – २२४.३६

एकूण – १,२१,९७८.१८

 

३१ जिल्ह्यांना मिळणार मदत

राज्यात साडेसात हजार मंडळांमधील नुकसानभरपाई निश्चित झाली आहे. ३१ जिल्ह्यांतील ७८ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.  नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश आहे.  राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली सुमारे ५८ लाख हेक्टर क्षेत्र आहे.  त्यातील सुमारे ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top