Mahabreaking

[breaking_news]

Immediately arrest : पोस्को कलम लावून आरोपी पोलिसाला तात्काळ अटक करा;बाळापुरात नागरिक आक्रमक

Immediately arrest : बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ५०५/२०२६ मधील आरोपी पोलिस शिपाई पवन उद्धवराव वडगावे याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध लैंगिक बालकांचे संरक्षण कायदा (पोस्को), २०१२ अंतर्गत कलमे तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी संबंधित कलमे लावावीत, अशी मागणी समस्त नागरिक व समाजबांधवांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Immediately arrest

  पोलिस शिपायाविरुद्ध कारवाईची मागणी तीव्र; अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा

बाळापूर : बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ५०५/२०२६ मधील आरोपी पोलिस शिपाई पवन उद्धवराव वडगावे याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध लैंगिक बालकांचे संरक्षण कायदा (पोस्को), २०१२ अंतर्गत कलमे तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी संबंधित कलमे लावावीत, अशी मागणी समस्त नागरिक व समाजबांधवांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १२ जुलै २०२६ रोजी पीडितेच्या वडिलांनी बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा तसेच पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी, २४ जुलैपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

निवेदनानुसार, तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेचा मोबाईल जप्त करण्यापूर्वी तिच्या वडिलांनी त्यातील माहितीचा बॅकअप घेतला होता. या बॅकअपमधील व्हॉट्सअॅप संदेशांवरून आरोपीचा पीडितेशी फेब्रुवारी २०२४ पासून संपर्क असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या काळात पीडिता अल्पवयीन असल्याने आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यान्वये कलमे समाविष्ट करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. त्यासाठी २१ जुलै २०२६ रोजी बाळापूर पोलिस ठाण्यात स्वतंत्र अर्ज सादर केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच आरोपीने फरार होण्यापूर्वी पीडितेच्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत घरात प्रवेश करून पीडितेची वैयक्तिक डायरी व कथितरित्या दिलेला टी-शर्ट नेल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत, त्यानुसारही संबंधित कायदेशीर कलमे लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात आरोपीला दोन दिवसांच्या आत अटक करून पोस्को कायदा व पुरावे नष्ट करण्यासंदर्भातील कलमे गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, राष्ट्रीय महिला आयोग (दिल्ली व मुंबई), पोलिस महानिरीक्षक अमरावती, पोलिस अधीक्षक अकोला तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top