Mahabreaking

[breaking_news]

Illegal sale : लोटस हॉटेलमध्ये अवैध विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश; २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sale : शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात खदान पोलिसांनी धडक कारवाई करीत २ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अकोला-मूर्तिजापूर महामार्गावरील लोटस हॉटेल येथे अवैधरित्या विदेशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी हॉटेल चालकासह त्याच्या वेटरविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal sale

 खदान पोलिसांची दारूविक्रीवर धडक कारवाई; हॉटेल चालकासह वेटरविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात खदान पोलिसांनी धडक कारवाई करीत २ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अकोला-मूर्तिजापूर महामार्गावरील लोटस हॉटेल येथे अवैधरित्या विदेशी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी हॉटेल चालकासह त्याच्या वेटरविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी खदान पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अकोला-मूर्तिजापूर महामार्गावरील लोटस हॉटेलचा चालक प्रतिक राजेश बोर्डे हा त्याचा वेटर वेतन राजू खंडारे यांच्या मदतीने अवैधरित्या विदेशी दारूची विक्री करीत आहे. विक्रीसाठी आणलेला दारूचा साठा पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात ठेवण्यात आल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे खदान पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष लोटस हॉटेल परिसरात छापा टाकला. यावेळी पोलिसांना विदेशी दारूचा साठा आढळून आला. त्यामध्ये ६५० एमएल क्षमतेच्या किंगफिशर बिअरच्या १० सीलबंद बाटल्या, किंमत ३ हजार रुपये, तसेच ६५० एमएल क्षमतेच्या टू बर्ग बिअरच्या चार सीलबंद बाटल्या, किंमत १ हजार २०० रुपये असा दारूसाठा मिळून आला.

तसेच एका पांढऱ्या रंगाच्या जुन्या वापरातील चारचाकी इंडिगो वाहनाची अंदाजे किंमत २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय १८० एमएल क्षमतेच्या सिग्नेचर विदेशी दारूच्या सात सीलबंद बाटल्या, किंमत ३ हजार ५०० रुपये, तसेच विदेशी दारू विक्रीतून मिळालेली ५ हजार ४५० रुपयांची रोकड प्रतिक राजेश बोर्डे याच्या अंगझडतीत मिळून आली.

अशा प्रकारे पोलिसांनी दारूसाठा, वाहन आणि रोख रकमेसह एकूण २ लाख १३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईनंतर संबंधित आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. राहुल जंजाळ, पोहवा रवि काटकर, पोकॉ. विकांत अंभारे आणि पोकॉ. शिवम दुबे, पोलीस स्टेशन खदान, अकोला यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top