Mahabreaking

[breaking_news]

old man :शौचालयात पाय घसरून पडल्याने ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; देऊळगाव राजात हळहळ

old man : शहरातील वार्ड क्रमांक २, समता कॉलनी येथे शौचालयासाठी गेलेल्या राहुल भिमराव काकडे (वय ४४) यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक ४१/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

Case registered
समता कॉलनीत राहुल काकडे यांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : शहरातील वार्ड क्रमांक २, समता कॉलनी येथे शौचालयासाठी गेलेल्या राहुल भिमराव काकडे (वय ४४) यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक ४१/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहुल काकडे हे आपल्या कुटुंबीयांसह देऊळगाव राजा शहरातील वार्ड क्रमांक २, समता कॉलनी येथे राहत होते. दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता राहुल हे शौचालयासाठी बाथरूममध्ये गेले होते. काही वेळाने बाथरूममधून आवाज आल्याने त्यांचे वडील भिमराव रामजी काकडे (वय ७०, व्यवसाय शेती, रा. दगडवाडी, हल्ली समता कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी बाथरूमकडे जाऊन पाहिले.
यावेळी राहुल काकडे हे बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले. शौचालयाला जात असताना त्यांचा पाय घसरून ते खाली पडले असावेत आणि त्यातून झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तोंडी रिपोर्टमध्ये नमूद केली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मर्गची नोंद मसफौ जाधव/८३१ यांनी केली असून, पुढील चौकशीची जबाबदारी पोहेकॉ गिते/१९७३ यांच्याकडे देण्यात आली आहे.
या घटनेची नोंद दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री ८.०७ वाजता करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील चौकशी व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top