Husamia Urdu High School : येथील हुसामिया उर्दू हायस्कूलने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण २२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

मजीब अहमद प्रथम; विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेत उत्साहाचे वातावरण
जाकीर अहमद
बाळापूर : येथील हुसामिया उर्दू हायस्कूलने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण २२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले. या निकालामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परीक्षेत मजीब अहमद जाफर अहमद याने ३९५ गुण मिळवत ७९ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. शेख सलमान शेख याकूब याने ३५१ गुणांसह ७०.२० टक्के मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर सदफ परवीन शेख महबूब हिने ३४० गुण मिळवत ६८ टक्क्यांसह तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यालय प्रशासनाने या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याला दिले आहे. शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल परिसरातून संस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे.

