Horrific Accident :पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम-अकोला मार्गावरील चिचखेड फाट्याजवळ गुरुवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आहे.

वाशिम-अकोला मार्गावर अपघाताचा थरार; चालक गंभीर, वाहतूक काही काळ विस्कळीत
निशांत गवई
पातूर : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम-अकोला मार्गावरील चिचखेड फाट्याजवळ गुरुवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमकडून येणाऱ्या एमएच ३० सीबी १८७७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले. विवरा येथील चालक अभिषेक मते हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार डॉपेवाड घटनास्थळी दाखल झाले. तसेच पत्रकार दुले खान, हुसेन खान, युसुफ खान, अनिकेत पोहरे, स्वप्नील गवई आदींनी जखमीला मदत करून पुढील उपचारासाठी रवाना केले. अपघातामुळे मुख्य मार्गावर निर्माण झालेली वाहतूक कोंडीही पोलिस व स्थानिकांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली.

