Mahabreaking

🔴 BREAKING
Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

Dr. Babasaheb Ambedkar :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती ‘मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटना, विभाग खामगाव’ च्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानवाच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

Dr. Babasaheb Ambedkar

खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती ‘मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटना, विभाग खामगाव’ च्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानवाच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

​कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अमर गवारगुरू, उपाध्यक्ष विजय दांडगे, सचिव महादेव हळम, संगम वानखडे मंडळ अध्यक्ष, पृथ्वीराज वानखडे उपाध्यक्ष, गडपाले, सचिन दुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे ब्रीदवाक्य आणि वीज क्षेत्रात बाबासाहेब यांचे अमूल्य कार्य माहिती देऊन, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय मिळवण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या वेळी संघटनेच्या वतीने   बोथाकाजी येथे विभागीय अध्यक्ष अमर गवारगुरू यांच्या निवासस्थानी मिरवणुकी दरम्यान भीम सैनिकांना सरबत व थंड पेय जल वितरित करण्यात आले. या वेळी संघटनेच्या वतीने विनोद गवई, संतोष इंगळे, नाना मोरे, शेख. कडू, शेख सादिक, गोपाल सोळंके, सतीश निंबाळकर, राहुल हिवराळे, पवन हिवराळे, भीम शक्ति क्रीडा मंडळातील पदाधिकारी आणि सदस्य इतर संघटनेचे सभासद उपस्थितीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top