Mahabreaking

[breaking_news]

Hands were raised :  रहमतच्या पावसासाठी हात उंचावले; नमाज-ए-इस्तिस्कामध्ये सामूहिक दुआचा स्वर घुमला!

Hands were raised : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना रहमतच्या पावसासाठी मंगळवारी मदरसा जामिया उल उलूमच्या विशाल मैदानात नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. अत्यंत नम्र आणि भावुक वातावरणात उपस्थितांनी अल्लाह तआलाच्या बारगाहमध्ये पावसासाठी सामूहिक दुआ केली.

Hands

   दुष्काळसदृश परिस्थितीत अल्लाहच्या रहमतीची आस; नमाज-ए-इस्तिस्कासाठी जनसमुदाय एकवटला

बाळापूर : पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना रहमतच्या पावसासाठी मंगळवारी मदरसा जामिया उल उलूमच्या विशाल मैदानात नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. अत्यंत नम्र आणि भावुक वातावरणात उपस्थितांनी अल्लाह तआलाच्या बारगाहमध्ये पावसासाठी सामूहिक दुआ केली.

नमाज-ए-इस्तिस्काची इमामत व दुआ हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद असलम कासमी यांनी केली. यावेळी शहरातील प्रमुख उलमा-ए-किराम, इमाम तसेच सामाजिक क्षेत्रातील जबाबदार व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये मुफ्ती अतहर इशाअती, मौलाना सिद्दीक इशाअती, अमीर-ए-जमाअत सिराज भाई, हाफिज रियाजुद्दीन यांच्यासह अन्य उलमांचा समावेश होता.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातून माजी आमदार सय्यद नातिकुद्दीन खतीब, माजी नगराध्यक्ष ऐनुद्दीन खतीब, न.प. सदस्य मोहम्मद सलीम कुरेशी, मोहम्मद अकरम, डॉ. फैयाज हुसेन, मोहम्मद हफीज, अतहर खान, डॉ. मुशीर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

तौबा-इस्तिगफारसह पावसासाठी सामूहिक दुआ

नमाजनंतर उपस्थितांनी आपल्या गुनाहांची माफी मागत अल्लाहची रहमत व करम प्राप्त व्हावे, तसेच दुष्काळसदृश परिस्थितीचा अंत होऊन भरपूर पाऊस पडावा, यासाठी मनापासून दुआ केली. यावेळी “या अल्लाह! तुझ्या रहमतीने पाऊस नाजील फरमा आणि दुष्काळी परिस्थितीचा अंत कर” अशी आर्जवपूर्ण प्रार्थना करण्यात आली.

सामूहिक दुआच्या वेळी संपूर्ण वातावरण आध्यात्मिक आणि भावुक झाले होते. नागरिकांनी तौबा व इस्तिगफार करीत अल्लाहच्या रहमतीची याचना केली.

आज आणि १० सप्टेंबरलाही नमाज-ए-इस्तिस्का

नमाज-ए-इस्तिस्काचे सलग तीन दिवस आयोजन करणे मुस्तहब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार बुधवार, ९ सप्टेंबर तसेच गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जामिया उल उलूमच्या मैदानात नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात येणार आहे.

आगामी नमाजमध्ये मौलाना सिद्दीक इशाअती, मुफ्ती अतहर इशाअती आणि मौलाना इस्माईल इशाअती हे इमामत, खुत्बा व दुआची जबाबदारी पार पाडणार आहेत.

मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तौबा व इस्तिगफार करावे आणि रहमतच्या पावसासाठी सामूहिक दुआ करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top