Mahabreaking

[breaking_news]

Gutkha :मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारा ५५.५७ लाखांचा गुटखा जलंबमध्ये पकडला! दोन बोलेरोसह दोघे जेरबंद

Gutkha : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची मध्यप्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या पथकाने आणि जलंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत तब्बल ५५ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ३४ लाख ५७ हजार १०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू तसेच २१ लाख रुपये किमतीच्या दोन बोलेरो पिकअप वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha

गुटख्याची तस्करी रोखली! महालक्ष्मी कृषी महाविद्यालयाजवळ पोलिसांचा सापळा; ३४.५७ लाखांचा गुटखा जप्त

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची मध्यप्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या पथकाने आणि जलंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत तब्बल ५५ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ३४ लाख ५७ हजार १०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू तसेच २१ लाख रुपये किमतीच्या दोन बोलेरो पिकअप वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक असलेल्या गुटखा आणि तत्सम सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणुकीवर प्रतिबंध घातला आहे. असे असतानाही या प्रतिबंधित पदार्थांची छुप्या मार्गाने वाहतूक आणि विक्री सुरू असल्याने पोलीस प्रशासनाकडून अशा अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

गोपनीय माहितीवरून नाकाबंदी

२१ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती येथे नियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांमधून बुलढाणा जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात आहे.

या माहितीच्या आधारे जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे पथक आणि जलंब पोलिसांनी संयुक्तरीत्या माटरगाव ते भास्तन रोडवरील महालक्ष्मी कृषी तंत्र महाविद्यालयाजवळ सापळा रचून नाकाबंदी केली.

दोन बोलेरो पिकअपमधून गुटख्याची वाहतूक

नाकाबंदीदरम्यान संशयास्पद दोन बोलेरो पिकअप वाहने पोलिसांच्या निदर्शनास आली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत विश्वजित संजय गव्हांदे (वय २९, रा. शंकरनगर, खामगाव, जि. बुलढाणा) आणि सुरेंद्र जानराव तायडे (वय ३६, रा. भीमनगर, जळगाव जामोद, जि. बुलढाणा) या दोघांना पकडण्यात आले.

५५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३४ लाख ५७ हजार १०० रुपये किमतीचा शासन प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन बोलेरो पिकअप वाहनांची किंमत २१ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ५५ लाख ५७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात अप.क्र. ३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २७४, २७५, २२३, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जलंब पोलीस करीत आहेत. प्रतिबंधित गुटख्याचा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

दोन्ही पथकांच्या संयुक्त प्रयत्नांना यश

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार अब्दुल माजिद, पोलीस हवालदार एजाज अहमद, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद अमीर तसेच जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस हवालदार होनमाने, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, शिनगारे, काकडे आणि गाडेकर यांनी संयुक्तरीत्या केली.

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या वाहतुकीमागील संपूर्ण साखळीचा तपास लागतो का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top