Mahabreaking

[breaking_news]

  Grand release :डाल्या चित्रपटाचे साखरखेर्ड्यात थाटात प्रदर्शन; श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांच्या हस्ते उद्घाटन

Grand release : साखरखेर्डा आणि देऊळगाव माळी येथील कलाकारांनी ग्रामीण जीवनावर आधारित ‘डाल्या अन् अंगार’ या चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलावंतांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन रविवारी, ५ जुलै रोजी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात मोठ्या उत्साहात पार पडले. मठाधिपती श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते फीत कापून चित्रपटाचे उद्घाटन करण्यात आले.

  Grand release

  ग्रामीण कलाकारांना मोठे व्यासपीठ; ‘डाल्या’ चित्रपटाचे पलसिद्ध महास्वामी मठात लोकार्पण

साखरखेर्डा : साखरखेर्डा आणि देऊळगाव माळी येथील कलाकारांनी ग्रामीण जीवनावर आधारित ‘डाल्या अन् अंगार’ या चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलावंतांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन रविवारी, ५ जुलै रोजी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात मोठ्या उत्साहात पार पडले. मठाधिपती श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते फीत कापून चित्रपटाचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रामीण भागातील कलाकारांना चित्रपटसृष्टीत संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि गावागावातील प्रतिभेला मोठ्या पडद्यावर स्थान मिळावे, या उद्देशाने सहकार विद्या मंदिरातील सहाय्यक शिक्षक सुनील गायकवाड यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. यापूर्वीही त्यांनी अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. स्वतः कलाकार असल्याने ग्रामीण भागातील दडलेली कला समोर आणण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातून या चित्रपटाची संकल्पना साकार झाली.

या उपक्रमात साखरखेर्डा माहेर असलेल्या सौ. उज्वला काळे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. बालवयापासूनच गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून त्यांनी आपल्या कलागुणांची छाप पाडली होती. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याबरोबरच मराठवाडा, महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. कलेविषयी असलेली ओढ आणि ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेतून त्यांनी या चित्रपटात भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. तसेच चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळही दिले. त्यांच्या सहकार्यामुळे ‘डाल्या’ चित्रपटाची निर्मिती पूर्णत्वास गेली.

चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्याला गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी उपसभापती सुनील जगताप, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे, तेजराव ठोसरे आणि डॉ. प्रशांत भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण जीवन, त्यातील संघर्ष, नाती आणि वास्तव यांचे चित्रण करणारा ‘डाल्या अन् अंगार’ हा चित्रपट स्थानिक कलाकारांसाठी अभिमानाची बाब ठरत असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील कलावंतांना नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजगुरू यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top