Mahabreaking

[breaking_news]

Rajarshi Shahu Maharaj: राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त बुलढाण्यात प्रथमच भव्य मिरवणूक; समस्त नागरिकांना सहभागाचे आवाहन

Rajarshi Shahu Maharaj: कोल्हापूर संस्थानाचे पुरोगामी राजे, महान समाजसुधारक आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण, आरक्षण, शेती, उद्योग तसेच अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून २०२६ रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सम्यक समन्वय समिती, बुलढाणा यांच्या वतीने प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, समस्त बुलढाणेकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Grand procession

 लोकराजा शाहू महाराजांना अभिवादनासाठी बुलढाणा सज्ज; २६ जून रोजी निघणार ऐतिहासिक जयंती मिरवणूक

बुलढाणा : कोल्हापूर संस्थानाचे पुरोगामी राजे, महान समाजसुधारक आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण, आरक्षण, शेती, उद्योग तसेच अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून २०२६ रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सम्यक समन्वय समिती, बुलढाणा यांच्या वतीने प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, समस्त बुलढाणेकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समितीच्या माहितीनुसार, २६ जून रोजी सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक येथील महापुरुषांच्या पुतळ्यांपासून मिरवणुकीला प्रारंभ होईल. एसबीआय चौक मार्गे ही मिरवणूक आयडीबीआय चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचेल. तेथे शाहू महाराजांना मानवंदना अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात येईल.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. तसेच गरीब, वंचित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार आदी विविध समाजघटकांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे ते बहुजन समाजाचे खरे लोकराजे ठरले.

राजर्षी शाहू महाराजांची जयंती भव्य स्वरूपात साजरी व्हावी यासाठी बुलढाणा शहरातील विविध पुरोगामी, बहुजनवादी व समविचारी संस्था, संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये महाबोधी महाविहार धम्मगिरी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, शहरातील विविध बुद्ध विहार समित्या, मराठा सेवा संघ, यशसिद्धी सैनिक सेवा संघ, सम्राट आखाडा, द बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, रमाईच्या लेकी, ब्ल्यू स्टार भीम कन्या ग्रुप, रमाई ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, लोकराजा शाहू फाउंडेशन, उबंटू उलगुलान, संवेदना प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बारा बलुतेदार महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन स्मारक समिती, मातोश्री रमाई मंडळ (सहयोग कॉलनी) तसेच शहरातील विविध समविचारी संघटना आणि बौद्ध उपासक-उपासिका संघ यांचा समावेश आहे.

या सर्व संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार असल्याने शाहू जयंती उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. सम्यक समन्वय समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने बुलढाणा शहरातील नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top