blood donation camp : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, बुलढाणा जिल्हा तसेच भारतीय जनता पक्षाच्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी (दि. २६ जुलै) देऊळगाव राजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील कायंदे यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

५४ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; भाजप व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, बुलढाणा जिल्हा तसेच भारतीय जनता पक्षाच्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने रविवारी (दि. २६ जुलै) देऊळगाव राजा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील कायंदे यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रेस्ट हाऊसजवळील सिव्हील कॉलनी परिसरातील डॉ. सुनील कायंदे यांच्या श्री डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आयोजित या शिबिरात युवक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. वाढदिवस साजरा करण्याबरोबरच समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
हे रक्तदान शिबिर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, बुलढाणा जिल्हा आणि भारतीय जनता पक्षाचे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा वाढण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

