Mahabreaking

[breaking_news]

Karmayoga Ayurveda :दिवाळीत आरोग्याला द्या खास भेट! कर्मयोग आयुर्वेदची विशेष पंचकर्म ऑफर; ११०० रुपयांत ८० मिनिटांचे उपचार

Karmayoga Ayurveda : दिवाळीचा उत्साह, सणासुदीची धावपळ, कामाचा ताण आणि प्रवासामुळे शरीर व मनावर येणारा थकवा दूर करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून बुलढाणा येथील कर्मयोग आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विशेष आयुर्वेदिक आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सवलतीच्या दरात विविध आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

dr date add

 थकवा, ताण विसरा… आयुर्वेदिक उपचारांचा अनुभव घ्या! शिरोधारा केवळ ८०० रुपयांत, दिवाळीच्या सुट्टीत घरी आलात? मग स्वतःसाठी ८० मिनिटे नक्की काढा!

बुलढाणा : दिवाळीचा उत्साह, सणासुदीची धावपळ, कामाचा ताण आणि प्रवासामुळे शरीर व मनावर येणारा थकवा दूर करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून बुलढाणा येथील कर्मयोग आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विशेष आयुर्वेदिक आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना सवलतीच्या दरात विविध आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या विशेष ऑफरमध्ये अवघ्या १,१०० रुपयांत ८० मिनिटांचे पंचकर्म उपचार पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये औषधी तेलाने संपूर्ण शरीराचा अभ्यंग मसाज, औषधी वाफेद्वारे स्वेदन, नस्य चिकित्सा तसेच वातशामक तेलाने कास्य थाळी मसाज अशा विविध उपचारांचा समावेश आहे.

शिरोधारा उपचारावरही विशेष सवलत

मानसिक विश्रांती आणि तणाव व्यवस्थापनासाठी आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या शिरोधारा उपचारासाठीही क्लिनिकतर्फे विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. औषधी तेलाचा वापर करून स्वयंचलित शिरोधारा मशीनद्वारे हा उपचार केला जातो. या उपचाराची नियमित किंमत १,२०० रुपये असून, दिवाळी विशेष ऑफरअंतर्गत तो केवळ ८०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याची संधी

दिवाळीच्या सुटीनिमित्त गावी आलेले नागरिक, दैनंदिन कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढू इच्छिणारे तसेच आयुर्वेदिक उपचारांची माहिती व अनुभव घेऊ इच्छिणारे नागरिक या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात.

यासंदर्भात डॉ. मनोज दाते म्हणाले, “दिवाळीत आपण घराची, कुटुंबाची आणि सणाच्या तयारीची विशेष काळजी घेतो; मात्र स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणेही तितकेच आवश्यक आहे. नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांचा अनुभव घेता यावा आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ही विशेष ऑफर सुरू करण्यात आली आहे.”

ही विशेष ऑफर ७ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.

अधिक माहितीसाठी व पूर्वनोंदणीसाठी संपर्क :

कर्मयोग आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, बुलढाणा

डॉ. मनोज दाते (MD आयुर्वेद)

मो. ७२१८१७११२१ / ७२७६४३०२४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top