Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Gharkul camp :बाळापूर पंचायत समितीत घरकुल कॅम्प; १८० हून अधिक लाभार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण

Gharkul camp : घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित मंजुरी व रखडलेल्या देयकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीमध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या संकल्पनेतून व गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित या कॅम्पमध्ये १८० पेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या अडचणी मार्गी लावण्यात आल्या.

Gharkul camp

राहुल सोनोने 

बाळापूर : घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित मंजुरी व रखडलेल्या देयकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीमध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या संकल्पनेतून व गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित या कॅम्पमध्ये १८० पेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या अडचणी मार्गी लावण्यात आल्या.

बाळापूर पंचायत समिती अंतर्गत अनेक घरकुल प्रस्ताव प्रलंबित होते. काही लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले नव्हते, तर काहींचे पेमेंट रखडले होते. अशा लाभार्थ्यांना आधार कार्ड, जॉब कार्ड व बँक पासबुकसह १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. कॅम्पला मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांनी प्रतिसाद दिला.

यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नियमित कॅम्प आयोजित करण्यात येणार असून घरकुल संदर्भातील अडचणी सोडवण्यास गती मिळणार आहे. ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंचांना कॅम्पची माहिती देण्याचे आदेशही देण्यात आले होते.

कॅम्पदरम्यान गटविकास अधिकारी बंडू नाना पजई पूर्णवेळ उपस्थित होते. त्यांच्यासह विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संदीप आगळे, विस्तार अधिकारी (कृषी) पुरुषोत्तम नाकट, स्थापत्य अभियंता साक्षी इंगळे तसेच आरएचई घरकुल विभागातील पवन पाटील, शशीपाल हरणे, निखिल गव्हाणकर, कोमल आगरकर, नयना नेमाडे यांच्यासह अनेक कर्मचारी व ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी सोडवण्यास मदत झाली असून प्रशासनाच्या या प्रयत्नांचे लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top