Mahabreaking

[breaking_news]

 Sant Gajanan Maharaj :संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पातूरमध्ये भक्तिसोहळा; शेकडो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ

Sant Gajanan Maharaj : विदर्भाचे आराध्य दैवत संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त अकोला रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, महाआरती, दहीहंडी व काल्याचे कीर्तन यांचे भक्तिमय आयोजन करण्यात आले. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. “गण गण गणात बोते” च्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.

 Sant Gajanan Maharaj

पातूर : विदर्भाचे आराध्य दैवत संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त अकोला रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, महाआरती, दहीहंडी व काल्याचे कीर्तन यांचे भक्तिमय आयोजन करण्यात आले. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. “गण गण गणात बोते” च्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.

संत गजानन महाराज मंदिर व संकटमोचन जागृत काळा मारुती मंदिर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ‘श्रींच्या विजय ग्रंथाचा’ भाविकांच्या साक्षीने समारोप करण्यात आला. सकाळी सहा वाजता गणेश धनस्कार व विष्णू धनस्कार यांच्या हस्ते श्रींची महापूजा संपन्न झाली, तर सकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली.

यावेळी भागवताचार्य हभप संतोष महाराज लाखकर (आळंदी) यांनी काल्याचे कीर्तन सादर करून “उपजोनिया पुढती येऊ – काला खाऊ दहीभाताचा” या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे सविस्तर निरूपण केले व काल्याचे धार्मिक महत्त्व स्पष्ट केले. हरीकीर्तनाला श्री खडकेश्वर भजन मंडळ, पातूर यांनी साथ-संगत दिली.

सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी बारा वाजता दहीहंडी व काल्याचे कीर्तन पार पडल्यानंतर भक्तांना शांततेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसाद सेवा संत गजानन महाराज सेवाधारी मंडळ व भक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.

या भक्तिसोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवून श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top