Mahabreaking

[breaking_news]

Ganesh immersion : ढोल-ताशांच्या गजरात बोरगाव मंजूत गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात

Ganesh immersion : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बोरगाव मंजू येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. यावेळी शहरातील एकूण १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.यंदाची मिरवणुक ही डिजेमुक्त पार पाडण्यात पोलिसांना यश आले.

Ganesh immersion

१२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग; पोलिसांचा चोख बंदोबस्त,डिजेमुक्त मिरवणुक

बोरगाव मंजू : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बोरगाव मंजू येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. यावेळी शहरातील एकूण १२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.यंदाची मिरवणुक ही डिजेमुक्त पार पाडण्यात पोलिसांना यश आले.

गेल्या दहा दिवसांपासून बोरगाव मंजू शहरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह अनेक भाविकांनी घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Ganesh immersion

शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या गणेशमूर्तींसह शहरातील प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक काढली. ढोल-ताशांचा गजर, गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मोठ्या भक्तिभावाने गणेशमूर्तींचे विसर्जन करून भाविकांनी गणरायाला निरोप दिला.

विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, पोलिस उपविभागीय अधिकारी वैशालीताई मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील वानखडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाला शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top