Mahabreaking

[breaking_news]

Gajanan Maharaj Temple :गजानन महाराज मंदिर वर्धापन दिन संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

Gajanan Maharaj Temple : मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे संत गजानन महाराज मंदिर वर्धापन दिन आणि तपपूर्ती सोहळा माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Gajanan Maharaj Temple

मेहकर  : मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे संत गजानन महाराज मंदिर वर्धापन दिन आणि तपपूर्ती सोहळा माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

नागरिकांच्या प्रतिसादातून बेलगाव येथे गजानन महाराज मंदिर उभारणी करण्यात आली होती. सदर ठिकाणी आज विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्धापन दिन आणि तपपूर्ती सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अनिल महाराज चेके यांचे प्रवचन झाले. वारकरी संप्रदायाने शेकडो वर्ष आपला प्रभाव कायम ठेवला ,याचे कारण मोठी संत परंपरा, त्यांचे सदविचार याचा वारसा इथल्या माणसांना समृद्ध करत गेला असे सांगून ते म्हणाले की, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनातून समाजाची एकजूटता वृद्धिंगत होते. संत गजानन महाराज यांचे जीवन कार्य आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे.

माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.उत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. डॉ. नामदेव वानखेडे, सुनील रामराव वानखेडे, नारायणराव वानखेडे, डॉ. मारोतराव वानखेडे, विजय जाधव ,अमोल वानखेडे, विठ्ठल वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top