Mahabreaking

[breaking_news]

Fulfill the promise :कोरोना काळातील वचन पाळा’; २३ महिन्यांच्या मानधनासाठी मेहकरात महिला कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Fulfill the promise : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस तसेच इतर महिला कर्मचाऱ्यांनी शासनाने जाहीर केलेले २३ महिन्यांचे विशेष मानधन अद्याप न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेहकर पंचायत समितीच्या नव्या इमारतीसमोर धरणे आंदोलन केले.

mehkar

कोरोना योद्ध्यांचा एल्गार; प्रलंबित विशेष मानधनासाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

मेहकर : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस तसेच इतर महिला कर्मचाऱ्यांनी शासनाने जाहीर केलेले २३ महिन्यांचे विशेष मानधन अद्याप न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेहकर पंचायत समितीच्या नव्या इमारतीसमोर धरणे आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कोरोना काळात त्यांनी रुग्णांचे सर्वेक्षण, जनजागृती, आरोग्य सेवा तसेच शासनाने सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्या काळात राज्य शासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा एक हजार रुपये विशेष मानधन देण्याची घोषणा केली होती. मात्र, पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही २३ महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

याच मागणीसाठी मेहकर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस आणि इतर महिला कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या नव्या इमारतीसमोर धरणे देत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान प्रलंबित मानधन तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

दरम्यान, मेहकर पंचायत समितीच्या नव्या इमारतीसमोर झालेले हे पहिलेच आंदोलन असल्याची चर्चा परिसरात रंगली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top