Mahabreaking

[breaking_news]

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस       

Amravati Teachers Constituency : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंगळवारी (६ ऑक्टोबर) २० उमेदवारांनी तब्बल २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ३१ झाली आहे. दरम्यान, आज दोन व्यक्तींनी सहा नामनिर्देशनपत्रे घेतली.

Amravati

  २० उमेदवारांची २९ नामनिर्देशनपत्रे ; ३१ उमेदवार मैदानात; आता माघारीकडे लागले लक्ष

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंगळवारी (६ ऑक्टोबर) २० उमेदवारांनी तब्बल २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ३१ झाली आहे. दरम्यान, आज दोन व्यक्तींनी सहा नामनिर्देशनपत्रे घेतली.

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने अपक्षांचा समावेश आहे. त्यामुळे छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहतात, याकडे आता शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.

शेवटच्या दिवशी कोणाकोणाचे अर्ज?

मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना व अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजप व दोन अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सूर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व तीन), भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव (भाजप व अपक्ष), प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष व तीन), प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी व अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष), किरण अर्जुन चौधरी (अपक्ष), हेमलता दिलीपसिंग मुनोत (अपक्ष), किरण अर्जुन पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी) आणि रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांचा समावेश आहे.

अनेक उमेदवारांनी पक्षासोबतच अपक्ष म्हणूनही नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या यात फरक आहे. त्यामुळे छाननी आणि उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

उद्या नामनिर्देशनपत्रांची छाननी

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांच्या कार्यालयातील सभाकक्ष क्रमांक २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे ही छाननी होईल.

छाननीदरम्यान उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची वैधता तपासली जाणार असल्याने त्यानंतरच निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे.

९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची संधी

उमेदवारी मागे घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. यासाठी उमेदवार किंवा त्याने लेखी प्राधिकार दिलेला प्रस्तावक अथवा निवडणूक प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे लेखी सूचना सादर करू शकतो.

छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कितीजण माघार घेतात आणि अंतिमतः किती उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहतात, याकडे आता अमरावती विभागातील शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top