Mahabreaking

[breaking_news]

Fire Unleashes :देऊळगाव राजा येथे अग्नीचे रौद्ररूप; पाच दुकाने आगीच्या भक्षस्थानी

Fire Unleashes : शहरातील मुख्य मार्गावरील देऊळगाव राजा-चिखली रोडवरील संतोष चित्रमंदिर चौकाजवळ अचानक भीषण आग लागल्याने परिसरातील ऑटोमोबाईल, किराणा तसेच इतर दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. या आगीत सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशमन दल काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही तासांत आग नियंत्रणात आली. दरम्यान, विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले.

Fire Unleashes

सव्वा कोटी रुपयांच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज ; आमदार मनोज कायंदे यांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांना दिले निर्देश

गजानन तिडके

देऊळगाव राजा :  शहरातील मुख्य मार्गावरील देऊळगाव राजा-चिखली रोडवरील संतोष चित्रमंदिर चौकाजवळ अचानक भीषण आग लागल्याने परिसरातील ऑटोमोबाईल, किराणा तसेच इतर दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. या आगीत सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशमन दल काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे काही तासांत आग नियंत्रणात आली. दरम्यान, विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले.

Fire Unleashes

सविस्तर वृत्त असे की, एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना अचानक लागलेल्या आगीमुळे शहरातील विविध भागांतून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच दलप्रमुख भगवान मापारी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आगीचे रौद्ररूप पाहता मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी जालना येथून अतिरिक्त अग्निशमन दलाला पाचारण केले.

या आगीत अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अशोक वाघ यांच्या हेअर सलून दुकानाचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. अशोक अग्रवाल यांच्या भरकादेवी आईस्क्रीम सेंटरमधील चार मोठे फ्रिज, इन्व्हर्टर व इतर साहित्य जळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर आशिष निमोदिया यांच्या किराणा दुकानातील सर्व भुसारमाल जळून सुमारे साठ लाख रुपयांचे नुकसान झाले. दिलीप निमोदिया यांच्या महालक्ष्मी एजन्सी किराणा दुकानातील विविध प्रकारचा किराणा माल जळून सुमारे 45 लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच रमेश तिडके यांच्या इलेक्ट्रिकल व मशिनरी दुकानातील विविध साहित्य जळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय बाजूच्या तीन दुकानांचेही काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे महसूल विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अशोक कुदळे यांचे दुकान पूर्णतः पाडावे लागले असून त्यांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच सुनील भुतेकर यांच्या दुकानाचे तीन लाख रुपये व यश पिंपळे यांच्या दुकानाचेही तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

आमदार मनोज कायंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संजय खडसे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत जमावाला आटोक्यात आणले. दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ धावपळ उडाली होती. शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक व नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top