Mahabreaking

[breaking_news]

Deulgaon Raja Taluka: देऊळगाव राजा तालुक्याचा दहावीचा निकाल 96.61 टक्के; मोठ्या शाळांचीही दमदार कामगिरी

Deulgaon Raja Taluka:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे – अमरावती विभाग यांनी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेचा देऊळगाव राजा तालुक्याचा निकाल 96.61 टक्के लागला आहे. तालुक्यातील विविध शाळांनी उत्कृष्ट गुणवत्ता दाखवत ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीचा ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे मोठ्या विद्यार्थी संख्येच्या शाळांनीही सातत्यपूर्ण आणि दर्जेदार निकाल कायम ठेवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

Deulgaon Raja Taluka
203 विशेष प्राविण्यांसह देऊळगाव राजा हायस्कूल अव्वल; 14 शाळांचा शंभर टक्के निकाल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे – अमरावती विभाग यांनी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेचा देऊळगाव राजा तालुक्याचा निकाल 96.61 टक्के लागला आहे. तालुक्यातील विविध शाळांनी उत्कृष्ट गुणवत्ता दाखवत ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीचा ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे मोठ्या विद्यार्थी संख्येच्या शाळांनीही सातत्यपूर्ण आणि दर्जेदार निकाल कायम ठेवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
तालुक्यात एकूण 2373 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2363 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले असून 2283 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे तालुक्याचा एकूण निकाल 96.61 टक्के इतका लागला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे फलित मानले जात आहे.
तालुक्यातील देऊळगाव राजा हायस्कूलने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक विद्यार्थी संख्येसह उल्लेखनीय यश मिळविले. या शाळेतून 515 विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि त्यापैकी 501 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 97.28 टक्के इतका लागला. विशेष म्हणजे तब्बल 203 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून 153 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली. मोठ्या विद्यार्थी संख्येमध्येही 97 टक्क्यांहून अधिक निकाल कायम ठेवत शाळेने गुणवत्ता सिद्ध केली आहे.छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयानेही समाधानकारक कामगिरी नोंदविली. या शाळेतून 305 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 94.42 टक्के इतका लागला आहे. 52 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर 94 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मोठ्या विद्यार्थी संख्येमुळे विविध गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना हाताळण्याचे आव्हान शाळेने यशस्वीरीत्या पेलल्याचे निकालातून स्पष्ट झाले.तालुक्यातील तब्बल 14 शाळांनी शंभर टक्के निकाल मिळवत उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची नोंद केली आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत देऊळगाव राजा हायस्कूल 203 विद्यार्थ्यांसह आघाडीवर राहिले. त्याखालोखाल सहकार विद्या मंदिर, देऊळगाव मही येथे 97, श्री औंधेश्वर विद्यालय येथे 53 तर छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूलमध्ये 52 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले. एकूणच, देऊळगाव राजा तालुक्याचा SSC निकाल 2026 हा गुणवत्ता, सातत्य आणि ग्रामीण भागातील वाढत्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक ठरला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

kayande
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा पार करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ आहे. या नव्या प्रवासासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! ज्यांना यंदा अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यांनी निराश होऊ नये.ही केवळ एक परीक्षा आहे — तुमचं संपूर्ण आयुष्य नव्या संधींनी भरलेलं आहे. आत्मविश्वास ठेवा, पुन्हा तयारी करा आणि पुढच्या वेळी निश्चित यशस्वी व्हाल!
मनोज कायंदे,आमदार, सिंदखेड राजा मतदार संघ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top