Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

illegal moneylenders : सावकारी जाचातून शेतकऱ्यांची सुटका; जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अवैध सावकारांवर लगाम 

illegal moneylenders : जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या जाचातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि त्यातून घडणाऱ्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हाती घेतलेली ठोस मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध सावकारांकडील शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळू लागल्याने आज अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

illegal moneylenders
बुलढाणा : जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या जाचातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि त्यातून घडणाऱ्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हाती घेतलेली ठोस मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध सावकारांकडील शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळू लागल्याने आज अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
“जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूतच आहेत,” अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत अवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेत जलदगतीने सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली जात असून, बहुतांश प्रकरणांत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात येत आहेत. चौकशीअंती दोषी आढळलेल्या अवैध सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

या शेतकऱ्यांना मिळाला न्याय
या मोहिमेमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्या आहेत. त्यामध्ये नागेश केशव कोल्हारे (घाटबोरी, ता. मेहकर) – ३ एकर २४ गुंठे, विजय बा. व्यवहारे (पोफळी, ता. मोताळा) – ६२ गुंठे, • रविंद्र कांडेलकर (वाघोळा, ता. मलकापूर) – ८२ गुंठे, विजय रामदास राठोड (हिवरा गडलिंग, ता. सिंदखेड राजा) – ७ एकर ३० गुंठे, शंकर कोंडिबा वाघ (पांगरी, ता. देऊळगाव राजा) – १.३८ हेक्टर, संजय उत्तम पाचरणे (मेहकर) – ०.७१ हेक्टर याशिवाय सावकारी कर्जामुळे मातृत्व गमावलेल्या वैष्णवी कैलास ढोले या मुलीने व तिच्या वडिलांनीही त्यांच्या संघर्षात प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

‘कायद्यांची अंमलबजावणी हेच माझे कर्तव्य’ – जिल्हाधिकारी
सत्कार स्वीकारताना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले, “केंद्र व राज्य शासनाने लोकहितासाठी केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय देणे हेच माझे कर्तव्य आहे.”
बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांकडून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी प्रशासन कडक कारवाई करीत असून, शेतकऱ्यांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
या लोकोपयोगी कार्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या वतीने चिखली येथील शिवाजी विद्यालयामार्फत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

७४ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत
जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जिल्ह्यातील ६९ प्रकरणांत अवैध सावकारांकडील ७४.२७ हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. यापैकी ५५ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले असून, ६५१ प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top